जळगाव (प्रतिनिधी )—- विठ्ठल नगर परिसरातील ज्ञानेश्वर दत्तू मिस्तरी या तरुणाने रेल्वे खालील स्वतःला जपून दे आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16सप्टेंबर रोजी सकाळी सहा सुमारास उघडकीस आली. मोठ्या भावाच्या आकस्मित निधनानंतर झालेल्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईक व पोलिसांनी कडून सांगण्यात येत आहे. ज्ञानेश्वर मिस्तरी याच्या मोठ्या भावाचे सुमारे चार महिन्यापूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला होता भावाच्या अचानक जाण्याने ज्ञानेश्वर मानसिक धक्क्यात होता तो सतत तणावाखली वावरत असल्याची माहिती नातेवाईकयांनी दिली

बुधवारी पहाटेच्या सुमारास ज्ञानेश्वर झोपेतून उठला असता त्याला आईने विचारणा केली त्यावेळी बाथरूम ला जात असल्याचे सांगितले. घराजवळ असलेल्या रेल्वे ट्रक वर जात त्याने समोरून येणाऱ्या रेल्वे खाली उडी घेतली.

सदर घटना पहाटे सहा च्या सुमारास उगडकीस आल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली ज्ञानेश्वर याचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला. तिथे ओळख पडल्यानंतर उर्वरित तपासणी करून मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात  देण्यात आला मोठ्या मुलाचा मृत्यूनंतर लहान मुलाचा ही मृत्यू झाल्याने ज्ञानेश्वर त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे

याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस कर्मचारी योगेश माळी हे करत आहे

Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version