मनपा जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवा
मुलींमध्ये स्वामी विवेकानंद व पोद्दार स्कूल विजयी; मुलांमध्ये इकरा शाहीन यांचा  दणदणीत विजय 
जळगाव : गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या फुटबॉल मैदानावर मनपा जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. फुटबॉल संघटनेचे सचिव तथा वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) कायम आमंत्रित सदस्य फारुक शेख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शक तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते किशोर चौधरी फुटबॉल संघटनेचे अँड आमिर शेख,भास्कर पाटील,प्रा डॉ अनिता कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
उद्घाटनप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शालेय स्तरावर अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडानैपुण्य, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे फारुक शेख यांनी बास्केटबल
१९ वर्षांखालील गट –  मुलींच्या सामन्यात स्वामी विवेकानंद कॉलेजने डॉ. जी. डी. बेंडाळे संघाचा ७-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटात इक्रा सालार नगरने छत्रपती कॉलेजवर १-० असा विजय मिळवला. इकरा शाहीनने अँग्लो उर्दू हायस्कूलचा ५-० असा पराभव केला. त्यानंतर स्वामी विवेकानंद संघाने इकरा सालार नगरचा ५-० असा पराभव केला.
अंतिम सामन्यात इकरा शाहीनने स्वामी विवेकानंदवर २-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.   
१४ वर्षांखालील गट पुढील प्रमाणे होते.
मुलींच्या गटात पोद्दार स्कूलने एल. एच. पाटील संघावर २-०, तर विद्या इंग्लिश स्कूलने सेंट टेरेसा संघावर ५-४ असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात पोद्दार स्कूलने विद्या इंग्लिश स्कूलचा २-० असा पराभव करून विजेतेपद मिळवले
मुलांच्या गटात झालेल्या सामन्यांत गोदावरी इंग्लिश मीडियमने मिल्लतवर ३-०, सेंट टेरेसाने ओरियन सीबीएसईवर २-०, विद्या इंग्लिशने विवेकानंद इंग्लिश स्कूलवर २-०, बी. यू. एन. रायसोनीने इक्रा सालार नगरवर ३-१, ओरियन स्टेट बोर्डने सरस्वती इंग्लिश मीडियमवर ३-१, सेंट जोसेफने एल. एच. पाटीलवर २-०, तर गोदावरी इंग्लिश मीडियमने पोद्दार इंटरनॅशनलवर ४-३  गोदावरी इंग्लिश स्कूल विवि पोदार स्कूलवर ४-३    विद्या विवि बी. यू. एन. रायसोनी  १-०   ओरियन स्टेट बोर्ड विवि  सेंट जोसेफ ७-६   सेंट टेरेसा स्कूल विवि रोझलँड १-० 
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमीर शेख, साबीर शेख, खालीद शेख, वसीम, रियाज, तौसीफ खान आणि वसीम चांद विशेष प्रयत्न करीत आहेत. स्पर्धेला विद्यार्थी, पालक व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १९ वर्षा आतील विजय व उपविजय मुलींचा संघ सोबत फारुक शेख,किशोर चौधरी व प्रमुख अतिथी  १४ वर्षातील विजयी व उपविजे मुलींच्या संघासोबत प्रमुखअतिथी होते.
Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version