दुष्काळी पंचनामा करतांना केळी पिकांचा ही पंचनामा व्हावा.
सुनील पाटील

चोपडा…(डॉ.अनिलकुमार पालीवाल) —-राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी चोपडा तहसीलदार थोरात यांना तालुक्यातील शेतकरी समस्या विषयी सविस्तर निवेदन सादर केले आहे.
चोपडासह महाराष्ट्रात ईतर ठिकाणी पिकांचे पंचनामे करतांना केळी पिकांसह सरसकट पंचनामे होत असून चोपडा तालुक्यात ही सरसकट पंचनामे झाले पाहीजे. अश्या मागणी सह शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील(वाळकी) पत्रकार मिलिंद देवराम सोनवणे, इंजि.सचिन सांगोरे, रविंद्र नत्थु पाटील,अविनाश चुडामन शिंदे,पंकज साहेबराव पाटील,रामकृष्ण पुंडलिक पाटील,अशोक शालीग्राम पाटील,भागवत दामोदर सोनवणे, सुभाष तुकाराम पाटील,देविदास गुलाबराव बोरसे,प्रकाश पाटील,राजू धनगर यांच्या स्वाक्षरी असून हे निवेदन कृषिमंत्री,जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी यांना ही ईमेलद्वारे देण्यात आले आहे.

Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version