जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड चाचणीरविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

जळगांव प्रतिनिधी —-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन *रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९ . ०० वाजता अनुभूती रेसिडेन्शियल शाळेच्या मैदानावर शिरसोली रोड जळगांव* येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्या मुलांचा जन्म दिनांक ०१.०९.२०११ रोजी वा त्या नंतरचा असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग खाली दिलेल्या लिंक https://forms.gle/jzkk7ntnD7D47SMj7 वर जाऊन गुगल फॉर्म ऑनलाईन भरून आपला सहभाग नोंदवावे व सोबत आपले आधार कार्ड अपलोड करावा तसेच निवड चाचणी साठी लागणारे क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज ओरिजनल जन्म दाखला / आधार कार्ड निवड चाचणी फी १०० रुपये सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन यांनी आव्हान केले आहे अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) मोहम्मद फजल ( ७८७५४६३०३२) यांचेशी संपर्क साधावा.
टिपः सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी आपला फॉर्म ऑनलाईन भरावा व निवड चाचणी फी १०० शंभर रुपये कॅश सुरूपात निवड चाचणीच्या दिवशी मैदानावर येऊन भरावे

Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version