आंतरशालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धेला शानदार सुरुवा
१५ वर्षे वयोगटात मनपा व जिल्हास्तरीय सामन्यांत अँग्लो उर्दू जळगाव व एम आय तेली भुसावळ
 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मु.जे. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आंतरशालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त किशोर चौधरी उपस्थित होते.१५ वर्षे वयोगट — मनपा जिल्हास्तरीय निकाल इकरा सालारनगर विजयी विरुद्ध पोद्दार — ३-१अँग्लो उर्दू विजयी विरुद्ध युनिक उर्दू — २-०विद्या इंग्लिश विजयी विरुद्ध इकरा सालारनगर — २-१अंतिम सामना : अँग्लो उर्दू विजयी विरुद्ध विद्या इंग्लिश मीडियम
१५ वर्षे वयोगट — उर्वरित जिल्हास्तरीय निकाल पुढील प्रमाणे घोषित  करण्यात आला.
बियाणी पब्लिक विरुद्ध एच.एस.डब्ल्यू.डी. भुसावळ — ३-०
 डॉ. उल्हास पाटील भुसावळ विजयी विरुद्ध डॉ. उल्हास पाटील सावदा — ३-०
विजय भुसावळ विजयी विरुद्ध एम.आय. तेली प्रायमरी — ४-३एम.आय. तेली ‘ए’ भुसावळ विरुद्ध विजय अलहिरा भुसावळ — ३-२अंजुमन साकळी विजयी विरुद्ध बियाणी पब्लिक — ३-०भुसावळ विजय विजयी विरुद्ध डॉ. उल्हास पाटील भुसावळएम आय तेली “ए” विजय विरुद्ध अंजुमन साकली ३-२
१५ वर्षे वयोगटात मनपा व जिल्हास्तरीय सामन्यांत अँग्लो उर्दू जळगाव व एम आय तेली भुसावळ विजयी
अंतिम सामना पुढील प्रमाणे – एम आय तेली भुसावळ विजयी विरुद्ध बी झेड हायस्कूल भुसावळ १-०
स्पर्धेतील विजयी संघांना हॉकी जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने चषक व पदकांचे वितरण करण्यात आले. यावेळी फारुक शेख व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेतील पंच म्हणून इम्रान बिस्मिल्ला, कृष्णा राठोड, इकबाल पिंजारी, शहबाज पिंजारी, शहजाद मिर्झा, युसूफ खान व राज सोनवणे यांनी काम पाहिले.
Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version