जळगाव – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मिरवणूक ड्रोनच्या माध्यमातून टिपत निगराणी करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. मिरवणुकीत सोडण्यासाठी गणेश मंडळाला क्रमांक देण्यात येणार आहे. संबंधित मंडळाला सोडण्याचा क्रमांक कोर्ट चौकातील मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोमवारी ही माहिती दिली

असे आहे नियोजन—  टॉवर चौक ते नेहरू चौक या संपूर्ण मार्गावर पीए सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक सूचना नागरिक व मंडळांना तात्काळ देता येतील. नेहरू चौक ते टॉवर चौक या मिरवणूक मार्गावर आवश्यक ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात येईल. उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गणराया पुरस्कार’ ठेवण्यात आले आहेत. गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या प्रत्येक ट्रॅक्टर चालकाची ब्रेट ॲनालिसरद्वारे तपासणी करण्यात येईल. महिलांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष स्नाचिंग स्कॉड तैनात करण्यात येईल. महिला दामिनी पथक तैनात असेल. बीडीडीएस स्क्वाड मार्फत रोड चेकिंग केली जाणार आहे.

सोशल मीडिया पेट्रोलिंग
यावर्षी विसर्जन मिरवणुकीत सोशल मीडिया सेल मार्फत सोशल मीडिया पेट्रोलिंग प्रभावी करण्यात येत आहे.
एसआरपीएफ कंपनी, होमगार्ड्स, आरसीपी, यांचा प्रभावी वापर आणि वाटप योग्य पद्धतीने करण्यात आले आहे. सर्व नॉन एग्जीक्यूटिव ब्रँचेस म्हणजे डीएसबी, एलसीबी, कंट्रोल, वेलफेयर, सायबर, रीडर ब्रांच या सर्वांना बंदोबस्त मध्ये स्ट्राईकिंग फोर्स म्हणून घेण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गुड मॉर्निंग स्क्वाड हा सतत सर्व धार्मिक स्थळ, पुतळे चेक करत असून, लक्षही दिले जात आहे. सेवा भावी संघटना आणि निवृत्त पोलीस यांनादेखील तैनात करण्यात येत आहे.
पोलीसंना जागीच फूड पॅकेट वाटप होणार आहे.

Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version