गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करुन गोवंश मांस विक्री करणाऱ्यांना सावदा पोलीसांचा जबर दणका

८५ किलो गोमांसासह २१,९००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.एकास अटक.

रावेर प्रतिनिधी( मुबारक तडवी )—– सावदा पोलीस स्टेशनचे हद्दीतीललोहारा ता. रावेर परिसरात बेकायदेशीररित्या गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून त्याच्या मांसाची विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन धडक कारवाई केली.

सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल/२४८६ मेहेरबान तडवी यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे की

दि. २८/०९/२०२६ रोजी सकाळी ६:२९ वाजेच्या सुमारास सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, सपोनि श्री. गणेश फड आणि सहकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोहारा ता. रावेर या गावच्या गुल्ली लोहारा भागात सुकी नदीच्या काठी असलेल्या एका घराच्या आडोशाला बेकायदेशीररित्या गोवंश जनावराचे मांस बाळगून त्याची विक्री केली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह सकाळी ६:५५ वाजता घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून घटनास्थळावरून एका आरोपीला रंगेहात पकडले, तर दुसरा आरोपी झाडाझुडपांचा आडोसा चा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींची नावे  १. सलीमखा महेमुदखा कुरेशी (रा. रसलपुर ता. रावेर) महेमुदखा कुरेशी, वय- ६६ वर्षे, रा. कसाईवाडा रसलपुर ता. रावेर – (ताब्यात घेतलेला आरोपी)
अकीलखा सलिमखा कुरेशी (रा. रसलपुर ता. रावेर – पळून गेलेला आरोपी) . असलम शहादुर तडवी (रा. गुल्ली लोहारा ता. रावेर) – (जागा मालक)
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत रु. २१,९००/-) ८५ किलो गोवंश जातीचे मांस (अंदाजे किंमत रु. १७,०००/-)
एक SUPER QUALITY वजन काटा (किंमत रु. ३,०००/-)
एक अखंड लोखंडी सुरा (किंमत रु. ५००/-
एक लोखंडी लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड (किंमत रु. ५००/-)
९००/- रुपये रोख रक्कम (१०० रुपयांच्या ८ नोटा व ५० रुपयांच्या २ नोटा)असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे  याप्रकरणी आरोपींविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात FIR No. 0242/2026 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.यामध्ये खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित २०१५) चे कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ)भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २७१, ३(५)महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १०५, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असूनघटनास्थळावरून गोमांसाचे नमुने तपासणीसाठी सीलबंद करून घेण्यात आले पुढील तपास पोहेकॉ अतुल तडवी हे करत आहेत.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, मा अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स. पो. नि. गणेश फड, पो. उ. नि. राहुल सानप, श्रे पो. उ. नि. जयराम खोडपे, पोहेका मेहरबान तडवी,पो हे कॉ अतुल तडवी, पो हे कॉ निलेश बाविस्कर, चालक पोकॉ विकास जोशी यांच्या पथकाने केली

Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version