महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर भवनकुळे आजपासून जळगाव जिल्ह्यात

जळगाव प्रतिनिधी::— महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक 3 शनिवारपासून  जळगांव जिल्ह्याच्या  दौऱ्यावर येत आहेत. नियोजित दौऱ्यानुसार श्री. बावनकुळे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर दाखल होऊन मुक्काम करतील

रविवारी दिनांक 4 सकाळी 9:50 ला शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतील सकाळी दहाला जिल्हाधिकारी कार्यालया आगमन झाल्यानंतर नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर दुपारी सव्वा बाराला एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथे दुष्काळग्रस्त भागातील पीक पहाणी करतील. त्यानंतर धुळे जिल्ह्याकडे रवाना होतील महसूलमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक राज शिष्टाचार सुरक्षा व वाहन व्यवस्थेबाबत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version