नाशिकमध्ये ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ

ह.भ.प. राजेंद्रजी तुपे महाराज करणार कथावाचन

नाशिक —(डॉ. अनिलकुमार पालीवाल, ज्येष्ठ पत्रकार, ) : श्री गणेशाय नमः व श्री सच्चियाय माताजींच्या कृपाशीर्वादाने नाशिक शहरातील रविवार पेठ परिसरात नवव्या श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ ते सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत स्वयं सच्चियाय भवानी माता स्थान, शनिदेव मंदिराजवळ, रविवार पेठ, नाशिक येथे हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. या नऊ दिवसीय श्रीमद् देवी भागवत कथेत प्रसिद्ध कथाकार ह.भ.प. राजेंद्रजी तुपे महाराज यांच्या रसाळ वाणीतून दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कथा निरूपण होणार आहे.
श्रीमद् देवी भागवत पुराणामध्ये आदिशक्तीचे स्वरूप, देवीची महती, भक्ती, श्रद्धा, धर्माचरण, सदाचार आणि जीवनातील आध्यात्मिक मूल्यांचे सुंदर विवेचन करण्यात आले आहे. या कथा ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून भाविकांना देवी उपासनेचे महत्त्व तसेच भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संस्कारांची शिकवण मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना सामूहिक कथा श्रवण आणि देवी आराधनेचा आध्यात्मिक लाभ मिळणार आहे.
या नवव्या श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन भक्तांच्या श्रद्धा आणि सहभागातून करण्यात आले असून, श्रीमती मंदाकिनी राजाभाऊ राठी, संजय राजाभाऊ राठी, चि. महेश तसेच कल्पेश संजय राठी यांच्या वतीने भाविकांना या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहर व परिसरातील सर्व देवीभक्तांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीमद् देवी भागवत कथा श्रवणाचा आणि ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version