अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या
“फाशीची शिक्षा झाली पाहिजे” — जळगाव एकता संघटनेची आक्रमक मागणी  पोलिसांच्या कारवाईचे स्वागत
जळगाव : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील अल्पसंख्याक समाजातील अल्पवयीन मुलीला १ ऑक्टोबर रोजी पळवून नेल्याच्या गंभीर प्रकरणात आरोपी गौतम भरत सपकाळे याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून न्यायालयाने कायद्यानुसार कमाल कठोर शिक्षा, तसेच कायद्याने शक्य असल्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी जळगाव एकता संघटनेने केली आहे.
या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात एफ आय आर क्र. 189/2026 अन्वये गुन्हा  भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव एकता संघटनेने पोलिसांशी सातत्याने समन्वय साधत प्रकरणाचा पाठपुरावा केला.
एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला शिरवेल महादेव परिसरातून अटक केली. अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या सुरक्षित ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
वाढीव कलमे; आरोपी पोलीस कोठडीत
पोलिसांनी तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या वैद्यकीय व इतर पुराव्यांच्या आधारे प्रकरणात बी एन एस कलm६५(१) तसेच पोक्सो मधील संबंधित कलमे वाढविल्याचे संघटनेने सांगितले आहे. आरोपीला अमळनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
“अल्पवयीन मुलींवरील अत्याचार सहन करणार नाही” – फारुक शेख
जळगाव एकता संघटने  फारुक शेख व्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही. या प्रकरणातील तपास वेगाने, निष्पक्षपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय पूर्ण करून दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार उपलब्ध असलेली सर्वात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी संघटना पाठपुरावा करणार आहे.
संघटनेच्या वतीने अमळनेर येथील सलीम शेख यांना फिर्यादीच्या बाजूने न्यायालयीन कार्यवाहीसाठी उपस्थित करण्यात आले आहे. तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामीण भागातील गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मानसिक, सामाजिक व आर्थिक आधार देण्याचे आश्वासन दिले.
पोलिसांच्या तत्पर कारवाईचे संघटनेकडून कौतुक
आरोपीला अटक करण्यासाठी केलेल्या कारवाईबद्दल एकता संघटनेने अपर पोलीस अधीक्षक दिलीप नखाते, अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंदारे,पी एस  आयश्रीमती शीतल वाजे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली यांचे आभार मानले आहेत.
संघटनेच्या वतीने फारूक शेख, आरिफ देशमुख, अन्वर सिकलगार, नजमुद्दीन शेख यांच्यासह स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते फारूकशा, जाहीर शेट, ताहेर शेट, मजहर, दिन जाहीर, वजाहत काजी, जावेद मेंबर, शकील मेंबर, कालू मेंबर, ओरियादुद्दीन व कबीर यांनी सहकार्य केले.
एकता संघटनेचा इशारा : तपासात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
“पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत जळगाव एकता संघटना शांत बसणार नाही. तपासात कोणतीही दिरंगाई, दबाव किंवा हलगर्जीपणा झाल्यास त्याविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने आवाज उठविला जाईल. अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे,” असा इशारा संघटनेने दिला.
Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version