मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन 

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन झाले आहे. लोककलेचा वारसा जपणाऱ्या समर्थ लावणी कलावंत म्हणून त्या ओळखल्या जायच्या.

वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी पुण्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. दीर्घ कालीन आजाराने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. मधू कांबीकर यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

दिग्गज अभिनेने नाना पाटेकर यांच्या निधनाच्या पाच दिवसांनंतरच लगेच मराठी चित्रपटसृष्टीने आणखी एक मोठा कलाकार गमावला आहे.

मधू कांबीकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या ‘सतीची पुण्याई’, ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांमधील भूमिका विशेष उल्लेखनीय होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून मधू कांबीकर यांनी आपल्या कलेची छाप पाडली.

ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देण्यातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. एकदा लावणी सादर करत असताना त्या भर स्टेजवर कोसळल्या. त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्या कित्येक वर्षे अंथरुणात होत्या.

समाज व्यवस्थेने नाकारलेल्या आणि सतत भटकंती करणाऱ्या कोल्हाटी समाजात मधू कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी झाला होता. त्यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द. घरात आठरा विश्व दारिद्रय, रोजचा दिवस कसा ढकलावा याचं टेन्शन असलेल्या समाजातून येऊन सुद्धा त्यांनी अथक परिश्रम करून नावलौकीक मिळवला. त्यांनी अभिनेत्री म्हणून लौकीक मिळवला.

Share.

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Leave A Reply

Exit mobile version