जळगावच्या मुली च्या हॉकी मैदानावर विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचा दबदबा
१४ व १७ वयोगटात विद्या विजेतेपद; १९ वयोगटात एम. जे. कॉलेजचा शानदार विजय
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय मनपा जिल्हास्तरीय मुलींच्या हॉकी स्पर्धेत खेळाडूंनी दमदार आणि रोमांचक खेळाचे प्रदर्शन केले
१४ वर्ष मुली विजेता — विद्या इंग्लिश मीडियम स्कूल १७ वर्ष विजेता — विद्या इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेता — गोदावरी अंतिम सामना : विद्या इंग्लिश मीडियम १-० गोदावरी १९ वयोगट मुली विजेता — एम. जे. कॉलेज उपविजेता — बेंडाळे कॉलेज पेनल्टी स्ट्रोकमध्ये एम. जे. कॉलेजचा २-० असा विजय झाला.
हॉकीला नवी दिशा, नव्या खेळाडूंना नवी संधी –
स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण हॉकी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कार्यकारी संचालक तथा हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे किशोर चौधरी, हॉकी जळगावचे अँड आमिर शेख,इम्रान बिस्मिल्ला, बेंडाळे तसेच गोदावरी महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका श्रीमती छाया चिरमाडे व स्नेहल कोल्हे , उदय फालक, आकाश सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगावच्या मैदानावर हॉकीचा उत्साह वाढतोय… फारुक शे
हॉकीला नवी दिशा, नव्या खेळाडूंना नवी संधी नवीन खेळाडू घडत आहेत. आणि जळगावचा हॉकीचा झेंडा राज्य व राष्ट्रीय स्तरावर फडकवण्याची तयारी सुरू आहे
हॉकी जळगाव — खेळाडू घडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे फारुक शेख यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विजय व उपविजयी संघांना ट्रॉफीसह खेळाडूंना मेडल देण्यात आले सदर मेडल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्पोर्ट्स च्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले.
मुख्य पंच म्हणून इम्रान बिस्मिल्ला, सह पंच इकबाल पिंजारी, शहबाज पिंजारी व गौरव सोनवणे यांनी कामगिरी पार पाडली
फोटो मध्ये —विजेते तिन्ही संघातील खेळाडू सोबत फारुक शेख , किशोर चौधरी,छाया चिरमाडे, उदय फालक आदी दिसत आहे.
