ज.सू खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगांव (प्रतिनिधी ) —-लोक शिक्षण मंडळ जळगाव संचलित स्वा. सै. ज. सु खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास कार्यक्रम रंगला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून गरबा व दांडियाच्या तालावर ठेका धरला संपूर्ण शालेय परिसर उत्साह ,आनंद आणि चैतन्यांनी भारावून गेला होता .
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, पाटीपूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे नंदिनीबाई विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. वैशाली झोपे मॅडम, सेवानिवृत्त शिक्षिका ललिता सोपान भोगे मॅडम व शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर सौ.प्रतिभा मिलिंद बारी व मुख्याध्यापक श्री सुनील पवार सर ,ज्येष्ठ शिक्षिका स्वाती चौधरी वंदना धुमाळ मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
विद्यार्थ्यांनी पारंपारिक रंगीबेरंगी पोशाख करून गरब्याची विविध आकर्षक सादरीकरण केली. पारंपारिक संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली . परीक्षकांनी नृत्याची लय ,ताल, सादरीकरण आणि वेशभूषा या निकषांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले .विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख
पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आत्मविश्वास आणि सांस्कृतिक परंपरा विषयी आदर निर्माण होतो असे मत सौ.वैशाली झोपे मॅडम यांनी मनोगतातून व्यक्त केले. केले तर डॉक्टर प्रतिभा बारी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आरोग्य व सकस आहार याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना ,पालकांना यामध्ये गरबा क्वीन, बेस्ट ड्रेस व हे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा इंगळे मॅडम यांनी केले. बक्षीस वितरण सौ. सरस्वती मराठे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी सहकार्य केले.
