Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्रीडा»जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात संप्पन
क्रीडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात संप्पन

By मुकेश जोशी, संपादकSeptember 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात संप्पन

१७१ खेळाडूंचा सहभाग, विविध वयोगटांत चुरशीच्या लढती

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव प्रायोजित ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धा ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली. जळगावचे वरिष्ठ खेळाडू स्व. अविनाश दामले यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती. ९, ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या एकेरी व दुहेरीसह खुल्या गटातील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी तसेच ३५ वर्षांवरील गटातील सामने घेण्यात आले. जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांतील १७१ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला

स्पर्धेतील विजेते व उपविजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनतर्फे आकर्षक चषक, सुवर्ण व रजत पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, राष्ट्रीय खेळाडू ब्रिजेश गौर, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, अमोल दामले, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे आणि प्रशिक्षिका दीपिका ठाकूर उपस्थित होत

असा आहे निकाल

९ वर्षांखालील मुली एकेरीत गाथा देशमुख विजेती, तर अनन्या माहेश्वरी उपविजेती ठरली. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनय पाटील, तर मुलींच्या एकेरीत सुमिती ठाकूर विजेते ठरले. १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत दर्शील मुनोत, मुलींच्या एकेरीत आरोही माहेश्वरी यांनी विजेतेपद मिळविले. १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनामय जोशी, तर मुलींच्या एकेरीत पलक महाजन विजेत्या ठरल्या. १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत नैतिक शिंदे, तर मुलींच्या एकेरीत ओवी पाटील विजेते ठरले. १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत फाल्गुन पाटील, तर मुलींच्या एकेरीत पूनम ठाकूर यांनी बाजी मारली. खुल्या पुरुष एकेरीत तेजम केशव, तर महिला एकेरीत राजश्री पाटील विजेते ठरले. पुरुष दुहेरीत प्रणव पाटील–शुभम पाटील, महिला दुहेरीत गीता पंडित–रीत नाथानी, तर मिश्र दुहेरीत राजश्री पाटील–उमेर देशपांडे यांनी विजेतेपद पटकावले. ३५ वर्षांवरील पुरुष एकेरीत चेतन वराडे, तर पुरुष दुहेरीत अतुल ठाकूर–चेतन वराडे विजेते ठरले. मिश्र दुहेरीत वृषाली धांडे–किर्ती मुनोत यांनी विजेतेपद मिळविले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे कौतूक केले.

  1. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य पंच दीपिका ठाकूर यांच्यासह सुफयान शेख, पूनम ठाकूर, अर्श शेख, फाल्गुन पाटील, तेजल भालेराव, वैष्णवी बोंडे, राखी ठाकूर व तेजम केशव यांनी पंच म्हणून काम पाहिले. विनीत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. किशोर सिंह यांनी आभार मानल –विजेत्या स्पर्धकांसह डावीकडून अरविंद देशपांडे, ब्रिजेश गौर, रजनीकांत कोठारी, अमोल दामले, चंद्रशेखर जाखेटे, विनीत जोशी, किशोस सिंग सिसोदिया, दीपिका ठाकूर.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article*प्लास्टिकमुक्त बाजारपेठ जनजागृती अभियान*
Next Article हरि विठ्ठल नगरातील तरुणाची नैराश्या तून आत्महत्या
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026

जळगावच्या  मुली च्या हॉकी मैदानावर विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचा दबदबा

October 14, 2026

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.