जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत पोदार स्कूल ला तिहेरी मुकुट
अंतिम सामन्यात बी.यू.एन. रायसोनीवर ३–० ने मात; १७ वर्षांखालील मुलांच्या गटात चुरशीच्या लढती
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने तसेच गोदावरी फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात सुरू आहे. विविध शाळांच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना मैदानावर चुरशीच्या लढती रंगवल्या.
मुलींच्या व मुलांच्या १७ वर्षांखालील गटात व १४ वर्ष गटात मुली पोदार स्कूल विजेता.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात पोदार स्कूलने बी.यू.एन. रायसोनी स्कूलचा ३–० गोलफरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत पोदारच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळ करत अंतिम सामन्यातही आपला दबदबा कायम ठेवला.
उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतील सामन्यांतही चुरस पाहायला मिळाली. गोदावरी स्कूलच्या एटी झांम्ब्रे वर १–०, सेंट टेरेसावर एल.एच. पाटीलविरुद्ध १–०, तर पोदार स्कूलने ओरियन सीबीएसईचा ३–० असा पराभव केला. बी.यू.एन. रायसोनीने गोदावरी स्कूलवर २–१ अशी मात केली. त्यानंतर पोदार स्कूलने सेंट टेरेसाचा १–० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटातही रंगल्या चुरशीच्या लढतीp
मुलांच्या १७ वर्षांखालील गटात पहिल्या टप्प्यात अनेक रोमांचक सामने झाले.
विद्या इंग्लिश स्कूलने ओरियन स्कूलचा १–० असा पराभव केला.
ओरियन सीबीएसईने अँग्लो उर्दू स्कूलवर १–० ने विजय मिळवला.
मिल्लत स्कूलने रोझलँड स्कूलचा २–१ असा पराभव केला.
सेंट जोसेफ स्कूलने इक्रा सालारनगरवर २–१ अशी मात केली.
आदर्श सिंधी स्कूलने सेंट टेरेसावर ३–२ ने विजय मिळवला.
विद्या इंग्लिश स्कूलने गोदावरी स्कूलचा २–१ असा पराभव केला.
पोदार स्कूलने इक्रा शाहिनवर २–० ने विजय मिळवला.
एटी झांब्रेने सरस्वती स्कूलवर २–० अशी मात केली.
एल.एच. पाटील स्कूलने प्रगती स्कूलचा २–० असा पराभव केला.
ओरियन सीबीएसई स्कूलने बी.यू.एन. रायसोनीवर ३–१ ने विजय मिळवला.
सेंट जोसेफ स्कूलने मिल्लत स्कूलचा १–० असा पराभव केला.
या सामन्यांमुळे १७ वर्षांखालील मुलांच्या गटातही पुढील फेरीसाठी चुरस निर्माण झाली आहे.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचे विजेतेपद
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलने अंतिम विजेतेपद पटकावल्याची माहिती आयोजकांनी दिली. या गटातील खेळाडूंनीही उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत स्पर्धेची रंगत वाढवली.
विजेत्यांचा गौरव
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांच्या खेळाडूंना जळगाव स्पोर्ट्स हाऊसतर्फे पदके, तर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
ही पारितोषिके जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख आणि देशमुख ॲडव्हर्टाईजचे संचालक आरिफ देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त व मार्गदर्शक किशोर चौधरी, फुटबॉल संघटनेचे ॲड. आमिर शेख, भास्करदादा पाटील, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, प्रा.छाया बोरसे, साबीर शेख, तौसिफ खान, वसीम रियाज,आणि हिमाली बोरवले यांची विशेष उपस्थिती होती.
गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेमुळे जळगावच्या शालेय फुटबॉलपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले असून, आगामी काळात जिल्ह्यातून गुणवंत फुटबॉलपटू घडण्यास या स्पर्धेचा निश्चितच हातभार लागणार आहे.
१४ वर्षा आतील मुले विजयी गोदावरी व उप विजयी संघ सेंट टेरेसा सह फारुक शेख, किशोर चौधरी व प्रमुख अतिथी
१७ वर्षे विजयी मुल आणि मुली पोद्दार स्कूल सह प्रमुख अतिथी फारुक शेख ,किशोर चौधरी व इतर
