Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्रीडा»जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
क्रीडा

जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

By मुकेश जोशी, संपादकOctober 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

१ किमी स्प्रिंटमध्ये १ मिनिट १९.१९ सेकंदांची वेळ नोंदवत पटकावले सुवर्णपदक
राज्य व विद्यापीठ संघांतून राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी

जळगाव, दि.10 ——- : ट्रॅक सायकलिंगमध्ये वेग आणि अचूकतेचा ठसा उमटवत जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे हिने पुणे विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या बळावर तिची अमृतसर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीमुळे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही तिला मिळाली आहे. आकांक्षा ही जैन इरिगेशनमधील सहकारी जी.एम. म्हेत्रे यांची मुलगी आहे.

पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या पुणे विद्यापीठांतर्गत विभागीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षाने महिला गटाच्या एक किलोमीटर स्प्रिंट प्रकारात १ मिनिट १९.१९ सेकंदांची वेळ नोंदवली. प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिने प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या यशामुळे १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान अमृतसर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तिचा मार्ग मोकळा झाला आहे.

आकांक्षाची राष्ट्रीय स्तरावरील ही या वर्षातील दुसरी महत्त्वाची संधी होय. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत तिने वरिष्ठ महिला गटात द्वितीय क्रमांक मिळवला होता. या कामगिरीच्या आधारे तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत ती राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. आकांक्षाने या पूर्वी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीबद्दल जैन इरिगेशन तसेच जळगावच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. राष्ट्रीय स्पर्धांत आपण चांगली कामगिरी करू असा आत्मविश्वास आकांक्षाला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशक्तीची आराधना, संस्कृतीचे जतन आणि समाजाला एकत्र आणणारा नवरात्रौत्सव
Next Article नेस्ले कंपनीच्या RSP उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.