Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जळगाव जिल्हा

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

By मुकेश जोशी, संपादकOctober 11, 2026Updated:October 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

जैन हिल्स ला ‘चला जाणूया नदीला’ महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान कार्यशाळाला सुरवात

जळगाव —– जेव्हा नदी प्रवाहीत होत असते तेव्हा ती समानतेला सोबत घेऊन येते. देशाचा विकास हा सनातन म्हणजे सदैव नित्य नुतन असावा यामध्ये नद्यांना उजाड, विनाश करणारा नसावा नदीला प्रदुषण, अतिक्रमण, पाण्याचे शोषणापासून मुक्त केले पाहिजे. यासाठी संत, समाज, प्रशासन, संस्था यांच्या माध्यमातून लोकसहभागातून कार्य वाढले पाहिजे. कारण नदीच्या आजूबाजूला शुद्ध हवा, जैववैविधता वाढल्याने जमिनीची धूप थांबत असल्याचे जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

जैन हिल्स येथे सुरू झालेल्या ‘चला जाणूया नदीला’ महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन उपस्थित होते. त्यांच्यासमवेत जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यनारायण बोल्लीसेटी, नरेंद्र चुघ, उज्ज्वलकुमार चव्हाण, शेखर निंबाळकर, गोपाळ पाटील, सतिश गोगुलवार आदी मान्यवर होते. मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये दि. ११ ते १३ दरम्यान होणाऱ्या या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून नदी प्रहरी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील १०८ नद्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीने अहवाल तयार करुन त्यावर पुढची दिशा ठरविण्यात येणार आहे. शासन प्रशासन, समाज यांच्या एकत्रित प्रयत्नातून या नद्यांचे ‘उगम ते संगमा’ दरम्यान करायवयाच्या उपाय योजनांवर कृतिशील आरखडा तयार असल्याचे प्रास्ताविकामध्ये नरेंद्र चुघ यांनी सांगितले. नदीला असलेल्या उपनद्या, नाले, ओढे, तलाव यांना प्रदुषण मुक्त ठेवण्यासाठी काम केले पाहिजे, नदीला नाल्या बनवू नये मात्र नाल्याला नदीमध्ये परावर्तित करण्याचे पवित्र कार्य झाले पाहिजे असे ते म्हणाले.

नदी सोबत आपले पणाचा व्यवहार केला पाहिजे असे सांगत पाण्याचे संवर्धन करण्याच सल्ला अजित जैन यांनी दिला. पाण्याच्या प्रत्येक थेंबात ऊर्जा आहे. तिचा कार्यक्षमतेने वापर झाला पाहिजे. कमीत कमी पाण्यातून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणी ह्याचाही विचार झाला पाहिजे. यासाठी ‘रिर्साेस टू रूट’ ही संकल्पना जैन इरिगेनने आणली. पाण्याच्या स्त्रोतापासून ते पिकांच्या मूळांपर्यंत पाणी हे कार्यक्षमतेने पोहचले पाहिजे, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धन, मृदासंवर्धनासोबतच पाण्याला सांभाळून ठेवता येईल. यासाठी जंगल, नाले, ओढे यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. नदी प्रदुषित झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा ते होण्याच्या आधीच उपाय योजना केल्या तर नदीचे संवर्धन खऱ्या अर्थाने होईल, त्यासाठी सांडपाण्याचा पुर्नवापर केला पाहिजे असे मनोगत अजित जैन यांनी व्यक्त केले.
उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी पाच पाटील ही संकल्पना नदी प्रहरींना समजून सांगितली. मान्यवरांच्या हस्ते गिरणा नदीवरील अहवाल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महात्मा गांधी यांच्या श्रमदान संकल्पनेतून माथा ते पायथा जलसंधारणाची कामे केली पाहिजे. चला जाणू या नदीला या उपक्रमासाठी प्रशासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल. यासाठी जिल्ह्यात त्यांनी तापी जलपुर्नभरण, गिरणा नदीवरील बंधारे, भागपूर व बोदवड उपसा सिंचन, वाघुर प्रकल्प तसेच शेततळ्यांची सविस्तर माहिती दिली. कृती संगमातून योजनांना मूर्त स्वरूप देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. जल बिरादरीचे अंकूश नारायणकर यांनी संचालन केले.

फोटो मध्ये चला जाणूया नदीला महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना अजित जैन, डॉ राजेंद्र सिंह, सत्यनारायण बोल्लीसेटी, नरेंद्र चुघ यांच्यासह मान्यवर

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदुष्काळी पंचनामा करतांना केळी पिकांचा ही पंचनामा व्हावा. सुनील पाटील
Next Article गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न.
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.