Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»कृषी»वाकोद येथे जागतिक बांबू दिन साजरा
कृषी

वाकोद येथे जागतिक बांबू दिन साजरा

By मुकेश जोशी, संपादकSeptember 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वाकोद, दि. १८ (प्रतिनिधी)_ – जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद येथील जैन फार्ममध्ये १८ सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बांबू पूजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला त्याच प्रमाणे बांबूच्या औषधी व पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला.

श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी १९८९ मध्ये वाकोद जैन फार्म येथे १० बाय १० अंतरावर मानवेल या वाणाचे बांबू प्रायोगिक तत्त्वावर लावले होते. बांबू वनस्पती बद्दल त्यांच्या मनात आस्था होती. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी बांबूचे महत्त्व आपल्या भाषणातून स्पष्ट केलेले आहे. “बांबू मला दृढनिश्चयाचं प्रतीक वाटतो. परिस्थिती कितीही कठीण असो, स्वाभिमानाने उभे राहण्याची प्रेरणा बांबूपासून मिळते” असे विचार त्यांनी मांडलेले आहेत.

वाकोद येथे २४ तासात ९ ते १२ इंच बांबूची वाढ झाल्याची नोंद घेतली आहे. बांबू ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती असून २४ तासांत तब्बल ४७.६ इंच वाढीचा वेग नोंदवला गेला आहे. तसेच, हेक्टरी दरवर्षी सुमारे १७ टन कार्बन शोषून घेण्याची क्षमता बांबूत आहे. बांबूच्या पानांचा रस घेतल्याने उंची वाढते, तर आंबेहळद, वेखंड व बांबूचा कोंब यांच्या उपचाराने ब्रेन ट्युमरच्या गाठी कमी होतात. बांबूच्या कोंबांचे लोणचे तसेच त्याची भाजी देखील आहारात उपयोगी ठरते. बांबूचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व असते असे वाकोद फार्मचे वरिष्ठ व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांनी उपस्थितांना सांगितले.

आयोजित कार्यक्रमात गणपत शेळके व सौ. करुणाबाई शेळके, तसेच विनोद सिंह राजपूत यांच्या हस्ते बांबू पूजन करण्यात आले. यावेळी संदीप बावस्कर, संतोष वानखेडे, विजय सपकाळे, चेतन धामोडे, सीमा जाधव, लताबाई जवखेडे, मीराबाई कुरंगे, रेणुकाबाई पाटील, रेखाबाई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातून जैन इरिगेशनने पर्यावरणीय व औषधी महत्त्वाची जाणीव करून देत समाजात हरित संस्कृतीचा प्रसार करण्याचा संदेश दिला. कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होय.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआंतरशालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धेला शानदार सुरुवात
Next Article जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.