Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्राईम»पोलीस दलाच्या दिमतीला १२ नव्या ‘बोलेरो निओ’ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण;
क्राईम

पोलीस दलाच्या दिमतीला १२ नव्या ‘बोलेरो निओ’ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण;

By मुकेश जोशी, संपादकSeptember 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या १२ नवीन महिंद्रा बोलेरो निओ श्रेणीतील चारचाकी वाहनांचे लोकार्पण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज येथील पोलिस आयुक्तालयातील आवारात करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, रेल्वे पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार, राहुल गायकवाड, मोटार परिवहन विभाग अधिकारी प्रवीण तायडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नव्या वाहनांमुळे पोलीस ठाण्यांची नियमित गस्त, बंदोबस्त तसेच आपत्कालीन प्रसंगी घटनास्थळी तातडीने पोहोचण्यास मदत होणार आहे. सन २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागासाठी एकूण १४ नवीन चारचाकी वाहनांना १ कोटी ४४ लाख २९ हजार २७८ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जळगाव पोलीस विभागासाठी १० तसेच चाळीसगाव व भुसावळ लोहमार्ग पोलिसांसाठी प्रत्येकी एक अशा १२ वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले. या १२ वाहनांची प्रत्यक्ष खरेदी किंमत १ कोटी १६ लाख १६ हजार रुपये आहे. उर्वरित दोन वाहने बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकासाठी आहेत.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाकडे सक्षम मनुष्यबळाबरोबरच पुरेशी वाहने आणि आधुनिक साधनसामग्री असणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या गरजांना सातत्याने प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिला आहे. नव्या वाहनांमुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होऊन नागरिकांच्या मदतीच्या हाकेला अधिक जलद प्रतिसाद देता येणार आहे.”
सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असल्याचे नमूद करताना पाटील म्हणाले की, “सण-उत्सव शांततेत आणि आनंदात पार पडावेत यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असून, पोलीस दलाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.”
मागील चार-पाच वर्षांत ३०१ वाहनांसाठी ११.५२ कोटी
जिल्हा वार्षिक योजनेतून गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत पोलीस विभागाच्या वाहन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. या कालावधीत ११३ चारचाकी आणि १८८ दुचाकी अशी एकूण ३०१ वाहने पोलीस विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी ११ कोटी ५२ लाख ३१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस ठाणे व विविध शाखांच्या क्षेत्रीय कामकाजासाठी वाहनांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की, “जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र लक्षात घेता वाहनांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. नव्या वाहनांमुळे पेट्रोलिंग, बंदोबस्त तसेच तातडीच्या घटनांना प्रतिसाद देण्याची क्षमता वाढणार आहे. विशेषतः सण-उत्सवाच्या काळात ही वाहने पोलीस यंत्रणेसाठी उपयुक्त ठरतील.” पोलीस दलाच्या गरजांना सातत्याने प्रतिसाद देत वाहनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसेवा संकल्प अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राची विशेष मोहीम
Next Article सोनी नगर परिसरात गतिरोधकांसह रस्ता सुरक्षा उपाययोजनांची मनसेचे मागणी
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.