लासुर येथे सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ
गणेश मंदिर परिसरात स्वच्छता महाअभियान; महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
लासुर, ता. चोपडा | डॉ.अनिलकुमार पालीवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या चोपडा पश्चिम मंडलाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांना लासुर येथे प्रारंभ करण्यात आला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक साखर बारव (पायविहीर) गणपती मंदिर परिसरात स्वच्छता महाअभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भगवान श्री गणेशाची महाआरती तसेच आशीर्वादाचा दीप प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतन करण्यात आले.
भाजपच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत महिनाभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनसेवेचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती चोपडा पश्चिम मंडलाध्यक्ष कांतिलाल पाटील यांनी दिली. तसेच चोपडा मंडलातील विविध वस्त्या, पाडे, खेडी व गावांमध्ये आशीर्वादाचा दीप प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या उपक्रमास पश्चिम मंडल सहप्रभारी तथा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. संध्या महाजन, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज पाटील, तीर्थक्षेत्र विकास आघाडी जिल्हाध्यक्ष हिंमतराव पाटील, माजी जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे, माजी सैनिक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश माळी, तालुका उपाध्यक्ष भिकन माळी, योगेश महाजन, सरचिटणीस मनोज सनेर, भरत सोनगिरे, लासुर उपसरपंच अनिल पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, शशिकांत मगरे, सरचिटणीस राकेश बागुल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच हेमंत माळी, भागवत पाटील, सुरेश माळी, संदीप महाजन, शरद पाटील, सुनील पाटील, जगदीश बोरसे, किरण करंदिकर, विकास पाटील, मनोहर पाटील, जितेंद्र चौधरी, गोरख पाटील, तुषार पाटील, चोपडा मंडल संयोजक ज्योत्स्ना चौधरी, सहसंयोजक खटाबाई कोळी, महिला मोर्चा जिल्हा पश्चिम मंडल अध्यक्षा डॉ. भारती क्षीरसागर, चोपडा शहराध्यक्ष वैशाली भावसार, उपाध्यक्ष विद्या सोनगिरे, सरचिटणीस आशा पाटील, भाजयुमो मंडलाध्यक्ष दत्तात्रय गुलाबराव कोळी, मुकेश माळी, आबा माळी, बजरंग भिल, संजय सोनवणे, योगेश पाटील, अविनाश पाटील, संदेश पाटील, अमोल महाजन, हिमांशू माळी, संजय कोळी, हर्षल पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
