Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव»खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार..महाराष्ट्रतून तुषार वाघुळदे यांची काश्मीरमध्ये होणाऱ्या ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलना’च्या प्रमुख निवेदक (अँकर) म्हणून निवड
जळगाव

खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार..महाराष्ट्रतून तुषार वाघुळदे यांची काश्मीरमध्ये होणाऱ्या ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलना’च्या प्रमुख निवेदक (अँकर) म्हणून निवड

By मुकेश जोशी, संपादकOctober 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार..महाराष्ट्रतून तुषार वाघुळदे यांची काश्मीरमध्ये होणाऱ्या ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलना’च्या प्रमुख निवेदक (अँकर) म्हणून निवड

श्रीनगर ( काश्मीर )—
काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘पहिले राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलन २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.हे संमेलन 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत होईल.या राष्ट्रीय पातळीवरील भव्य व दिमाखदार संमेलनाचे मुख्य सूत्रसंचालन (Anchoring) करण्याची जबाबदारी उत्तर महाराष्ट्रातील नामवंत व सेलिब्रिटी अँकर आणि कलावंत तुषार वाघुळदे (जळगाव) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.ही निवड महाराष्ट्र चित्रपट कलाकार असोसिएशनने केली आहे.डायरेक्टर्स व प्रोड्युसर्स यांची ही प्रमुख आणि जबाबदार संघटना आहे.खान्देशातील तुषार वाघुळदे यांची या पदासाठी अधिकृत निवड झाल्याने संगीत आणि कला क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

देशभरातील कराओके गायकांना आणि संगीतप्रेमींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात करण्यात आले आहे.या संमेलनात भारतातील विविध राज्यांमधून शेकडो प्रतिभावान कराओके गायक,गायिका संगीतकार आणि क्षेत्रातील दिग्गज एकत्र येणार आहेत.हे संमेलन ऐतिहासिक होणार आहे.अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची मुख्य धुरा सांभाळण्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव तुषार वाघुळदे यांची निवड होणे ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.श्री.वाघुळदे हे मराठी फिल्म्स चेंबर्स ऑफ कॉमर्स ,कोल्हापूरचे माजी सचिव असून अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे माजी सदस्य तसेच सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये कार्यरत आहेत,त्याचप्रमाणे ऑर्केस्ट्रा 7 स्ट्रिंग्स या प्रसिद्ध ग्रुपचे संचालक, ऑर्गनायझर आहेत.
कलावंत तुषार वाघुळदे यांनी आपल्या दमदार आवाज व बहारदार शैलीने,उत्कृष्ट संवाद कौशल्याने,समयसूचकता आणि हजरजबाबीपणाने यापूर्वी अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम यशस्वीपणे गाजवले आहेत.एक “उत्कृष्ट निवेदक” म्हणून श्री.वाघुळदे यांचे नवी मुंबई, पनवेल,सिंधुदुर्ग,छत्रपती संभाजी नगर,लातूर,परभणी,अहिल्यानगर,नाशिक,बऱ्हाणपूर,खंडवा,पुणे,पिंप्री चिंचवड, सांगली,कोल्हापूर,नागपूर,अमरावती,चंद्रपूर, भंडारा, अकोला,धुळे,इंदोर,भोपाळ,इटारसी (मध्यप्रदेश) चितोडगड,कोटा (राजस्थान) सहारणपूर, विजयवाडा ( आंध्रप्रदेश) यासह अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रम गाजवले आहेत.संगीत क्षेत्राची उत्तम जाण आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची त्यांची हातोटी लक्षात घेऊनच आयोजकांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना तुषार वाघुळदे म्हणाले, “काश्मीरसारख्या विहंगम व नंदनवन आणि निसर्गरम्य अशा भूमीवर होणाऱ्या ‘पहिल्या ऐतिहासिक राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनाचे’ सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळणे हे माझे भाग्य समजतो.या राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मला अत्यंत आनंद होत असून उर अभिमानाने भरून आला आहे आणि हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देईन.” आणि महाराष्ट्र व खान्देशच्या लौकिकात मोलाची भर घालेन..!

या निवडीबद्दल राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, संगीत क्षेत्रातील कलाकार,त्यांचे मित्रपरिवार,इव्हेंट्स ऑर्गनायझर्स आणि हितचिंतकांनी तुषार वाघुळदे यांचे अभिनंदन करून त्यांना काश्मीरमधील या पुढील प्रवासासाठी आणि संमेलनाच्या यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.(  संपर्क :- 9405057141 तुषार वाघुळदे )

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसायबर सुरक्षिततेसाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – पोलीस निरीक्षक राहुल वाघ
Next Article महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आजपासून जळगाव जिल्ह्यात
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.