Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव»गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

By मुकेश जोशी, संपादकOctober 5, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमधील युवकांशी सुसंवाद
जळगाव, दि. 5 (प्रतिनिधी) :— ‘स्वतः पाहा, स्वतः विचार करा, स्वतः शिका आणि अनुभवातून पुढे जा,’ हा श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंचा स्वभावच होता. एखादी गोष्ट कशी करायची, एवढ्यावर ते थांबत नसत. ती का करायची, तिच्यामागचा विचार काय आहे आणि त्याचा समाजाला काय उपयोग होणार आहे, हे समजून घेण्याची सवय त्यांनी आम्हाला लावली. असे त्यांनी सांगून युवकांसह पुढील पिढीसाठी इंटरॅक्टिव्ह, ऑडिओ-व्हिडिओचा उपयोग करून गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘गांधीतीर्थ’ ची निर्मिती केली आहे. दीपस्तंभाप्रमाणे भविष्यातदेखील गांधीतीर्थचे काम सुरू राहील, अशी ग्वाही जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली. गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पचा ३ ऑक्टोबर रोजी समारोप झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अश्विन झाला हे होते. शिबिराच्या काळात घडलेल्या गोष्टींचे एकत्रित संकलन केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करून सहभागी शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना ते अशोक जैन म्हणाले की, ‘आमचे वडील श्रद्धेय मोठेभाऊंनी आयुष्यभर केवळ एक संस्था उभी केली नाही, तर माणसं घडवली. त्यांची काम करण्याची पद्धतच त्यांची शिकवण होती. आम्हा मुलांना किंवा सहकाऱ्यांना त्यांनी कधी बसवून मोठमोठे धडे दिले नाहीत. त्यांचं स्वतःचं जगणं, काम करणं आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची त्यांची नजर वेगळी होती. ते म्हणजे ‘ओपन युनिव्हर्सिटी’ होते. ते आज प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांची उपस्थिती आजही जाणवते,’ असे भावनिक विचार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘हिंदी है हम करोडो करोड…’ हे गाणे नरेंद्र वडगावकर यांनी सादर केले. आसाम राज्यातील सहभागी विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या पारंपरिक जापी टोपीने अब्दुलभाई यांच्या हस्ते अशोक जैन यांचा सत्कार करण्यात आला.
‘ती आणि मी’ या मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतही रूपांतर झाले. असे उपस्थितांना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अशोक जैन यांनी या संवादात उत्तरे दिली. त्यानंतर शिबिरार्थींचे प्रातिनिधीक मनोगत व्यक्त झाले. त्यात प्रिया दुबे, शिवानी बाथम (मध्य प्रदेश), अनुराग सिंग (पश्चिम बंगाल), राकेश कुमार (बिहार), रितेश कुमार (छत्तीसगड), पैंजन गुरनुले (महाराष्ट्र) यांचा समावेश होता. दीपक मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले.

गांधीतीर्थ परिसरात भारताचा दगडी नकाशा उभारणार
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमात ‘भारत की संतान’ हे भारतातील विविध राज्यांच्या भाषा, वैविध्यपूर्ण, समृद्ध आणि चैतन्यमय संस्कृतीचे मनोहारी सादरीकरण झाले होते. त्यात सहभागी नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमधील युवकांचे त्यांनी अभिनंदन केले. राज्याचे सादरीकरण होतांना नकाशातील त्या त्या राज्यांसमोर मेणबत्ती पेटविली जायची. ही संकल्पना आपल्याला खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले. याच धर्तीवर भारताचा मोठा दगडी नकाशा कलात्मक पद्धतीने तयार करून गांधीतीर्थ परिसरात त्याची मांडणी करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवुन त्यांना मदत करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Next Article जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..! महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.