Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव»जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..! महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन
जळगाव

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..! महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन

By मुकेश जोशी, संपादकOctober 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन

जळगाव :—जळगाव जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत समाधानकारक पाऊस न पडल्याने राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व १५ तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनानुसार जळगाव शहर महानगरपालिकेने पाणी नियोजनासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी (दि. ६) महापौर दीपमाला काळे यांनी पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक घेऊन शहरातील पाणी पुरवठा आणि नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस पाणीपुरवठा विभाग प्रमुख घृष्णेश्वर साळुंखे यांच्यासह संबंधित अभियंते व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील पाण्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीत माहिती देताना महापौरांनी सांगितले की, सुदैवाने मागील काळात वाघूर धरणात पाण्याचा साठा व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आल्यामुळे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत त्याचा मोठा आधार व लाभ शहराला मिळत आहे. धरणात पुढील जून महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, हे पाणी जूनपर्यंत टिकवण्यासाठी सर्वांनी काटेकोरपणे पाणी बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. शहरात अनेक भागांत गरजेपेक्षा जास्त वेळ पाणी राहून ते वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शहरातील सर्व भागांचा सर्व्हे करून पाणी पुरवठ्याची वेळ समान निश्चित केली जाईल, जेणेकरून कुठेही पाणी सांडणार नाही, असे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

नळांना तोट्या बसवणे बंधनकारक; दोन दिवसांनंतर होणार कारवाई
शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरगुती व व्यावसायिक नळांना तत्काळ तोट्या (कॉक्स) बसवून घ्याव्यात. ज्यांच्या नळांना तोट्या नसतील किंवा जे पाणी वाहू देतील, अशांवर पुढील दोन दिवसांनंतर महानगरपालिकेकडून थेट दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. शहरात कुठेही पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती फोटोसह महानगरपालिकेला द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

उघड्या नळांमधून किंवा पाईपद्वारे गटारात पाणी सोडणे, धुळीसाठी किंवा स्वच्छतेसाठी रस्त्यावर पाणी मारणे, पाईपने वाहनांवर पाणी मारून गाड्या धुणे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांचे फोटोसहित पुरावे प्राप्त होताच त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर दीपमाला काळे यांनी दिला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
Next Article आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.