Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव»जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

By मुकेश जोशी, संपादकOctober 12, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत कार्यशाळेत झाले विचारमंथन

जळगाव, दि. १२ (प्रतिनिधी) : पावसाच्या पाण्याचे संकलन, जलसाठ्यांची निर्मिती आणि जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामांतून जल व्यवस्थापनाचा वस्तुपाठ अनुभवण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत आयोजित महाराष्ट्र नदी संवर्धन कार्यशाळेतील सहभागी सदस्यांनी सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी जैन हिल्स येथील विविध जलसंधारण प्रकल्पांना भेट दिली. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कामांची पाहणी करताना श्रद्धाधाम, भाऊंची सृष्टी, जैन इरिगेशनने दुरुस्ती केलेला जिल्हा परिषदेचा तलाव अशा विविध ठिकाणच्या कामांची माहिती घेण्यात आली. जलसंधारणाच्या या प्रत्यक्ष अनुभवासोबतच नदी संवर्धन, लोकसहभाग आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवरही कार्यशाळेत मंथन झाले.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कामांची माहिती क्षेत्रभेटीत घेण्याचे आवाहन जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी आपल्या उद्घाटन भाषणात केले होते. त्यानुसार आजच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रथम श्रद्धाधाम येथे भेट देण्यात आली. जैन हिल्सपरिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे एकत्रीकरण करून श्रद्धाधाम येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करण्यासाठी विकसित केलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर भाऊंची सृष्टी डोंगर माथा परिसरातील सुमारे दोन कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेच्या जलाशयाचीही माहिती घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील तलावाची पाहणी करण्यात आली. हा तलाव जैन इरिगेशनच्या अखत्यारीत नसला तरी त्याच्या दुरुस्तीचे काम कंपनीने केले आहे. या प्रकल्पांची माहिती जैन इरिगेशनचे सहकारी पी. ए. पाटील तसेच पीआरओ गिरीश कुळकर्णी यांनी उपस्थितांना दिली.

क्षेत्रभेटीनंतर झालेल्या सत्राचे प्रास्ताविक अंकुश नारायणकर यांनी केले. जलबिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष नरेंद्र चूघ यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. त्यात जयाजी पाईकराव, एच.पी. देशमुख, एकनाथ माळतकर, मनोहर हेपाट, सविता राजपूत, आरती पाटील यांनी सहभाग घेतला. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या विषयाचे उदाहरण घेऊन नदीविषयक कामांची माहिती दिली, तर मुरलीधर बेलखोडे यांनी सूक्ष्म पाणलोट क्षेत्रनिहाय नियोजन आणि नद्यांचे महत्त्व स्पष्ट केले. शाळा, महाविद्यालये आणि एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याची गरज अधोरेखित केली. सविता राजपूत यांनी नदी संवर्धनासाठी लोकचळवळीचे महत्त्व सांगितले. आरती पाटील यांनी नदी-नाले, ओढे, वृक्षसंवर्धन आणि कचरा व्यवस्थापनावर विचार मांडले. नदी संवर्धनाची जबाबदारी, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, उगमापासून संगमापर्यंतचे नियोजन, किमान तीन ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची आवश्यकता आणि केटी वेअर व बंधाऱ्यांच्या उभारणीत जैवविविधतेचा विचार या मुद्द्यांवर चर्चा झाली. विजय चिमणकर यांनी ‘ग्रीन सर्जन’ ही संकल्पना मांडून युवकांना या कामांमध्ये आकृष्ट करून त्यांना ग्रीन सर्जन संबोधावे असे विचार मांडले.

नद्यांची अवस्था वाईट झालेली आहे. काही तरी चुकले आहेत काही नद्या प्रदूषित पाणी घेऊन वाहत आहेत तर काही नद्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती बदलावी यासाठी जिल्हा निहाय समिती तयार करून त्यावर विशेष कामगिरी करण्यात यावी अशी महत्त्वाची सूचना चर्चासत्राचे अध्यक्ष नरेंद्र चूघ मांडली. त्याच प्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात शिवाजी नाना पाटील, गोविंद जामदार, डॉ. हनुमंत साळुंखे, विलास साबळे, जयाजी पाईकराव, नरेंद्र चुघ, अभिजित शितोळे, चंद्रकांत उत्तेकर, गोकुळ सुरासे तसेच ईश्वर पाटील, विजय चिमणकर, प्रकाश अर्जुनकर, सुनील रहाणे, विशाल सोमकुल, प्रमोद सरदार आणि चुन्निलाल ब्राह्मणे यांनी आपले विचार व्यक्त केले. नदी संवर्धनासाठी विविध यंत्रणांमधील समन्वय, स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग आणि शास्त्रीय पद्धतीने जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्याची गरज या चर्चासत्रांतून अधोरेखित झाली.

कार्यशाळेचा १३ ऑक्टोबर रोजी समारोप

या कार्यशाळेचा समारोप १३ ऑक्टोबर रोजी जलपुरुष राजेंद्र सिंह तसेच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या उपस्थितीत होणार आहे. राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागात गावकऱ्यांसोबत मिळून काम करण्यास राजेंद्र सिंह यांनी सुरुवात केली. त्यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी पारंपरिक ‘जोहड’ (पाणी साठवण्याचे मातीचे छोटे बंधारे) पुन्हा जीवंत केले आणि हजारो जलसंधारण संरचना उभारल्या त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना मिळणार आहे.

_फोटो म्हध्ये – ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जैन हिल्स येथे आयोजित महाराष्ट्र नदी संवर्धन कार्यशाळेत विचार व्यक्त करताना बोरणारे, व्यासपीठावर एच. पी. देशमुख, आरती पाटील, सविता राजपुत, मनोहर हेपाट, मुरलीधर बेलखोडे, नरेंद्र चुघ आदी मान्यवर दिसत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअमळनेरचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान!
Next Article वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.