Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्रीडा»जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रीडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

By मुकेश जोशी, संपादकOctober 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

पाचही प्रतिस्पर्ध्यांना २५-० ने हरवित मिळविले निर्विवाद यश

जळगाव, दि. १३ ——- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील मनपा कॅरम स्पर्धेत विद्या इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकावले. तिने स्पर्धेतील पाचही प्रतिस्पर्ध्यांना २५-० अशा फरकाने पराभूत करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला चषक देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा ११ ऑक्टोबर रोजी कांताई सभागृहात पार पडली. या स्पर्धेत विविध शाळांमधील ६४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. दुर्गेश्वरीने पहिल्या फेरीत श्रुष्टी शिंपी, तर पुढील फेरीत गोजराणी बोडबडे आणि दिव्या गायकवाड यांच्यावर मात केली. उपांत्य फेरीत आयशा शेख हिला पराभूत करीत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रावणी मोरे हिला पराभूत करून दुर्गेश्वरीने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
पारितोषिक वितरण समारंभाला अताउल्ला खान, सय्यद मोहसीन, जिया खान, तन्वीर खान, शिवछत्रपती पुरस्कारविजेते योगेश धोंगडे आणि शिक्षिका कोमल तायडे उपस्थित होते. दुर्गेश्वरीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात आले.

निकाल पुढील प्रमाणे       पहिल्या आठ क्रमांने विजयी झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत. दुर्गेश्वरी योगेश धोंगडे विजयी, उपविजयी श्रावणी मोरे (विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल), तृतीय क्रमांकाने जुनेरा खाटिक, चतुर्थ क्रमाकाने आयशा शेख (ईकरा शाहिन), आराध्या एकशिंगे, दिव्या गायकवाड (अनुभूती स्कूल), अलिस्बा खान (ईकरा शाहीन), नेहा शेख (अलफैज स्कूल)

फोटो कॅप्शन ——: जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या दुर्गेश्वरी धोंगडे हिच्यासोबत मान्यवर

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticlePrevious Post
Next Article नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.