Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
जळगाव जिल्हा

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

By मुकेश जोशी, संपादकOctober 13, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ नवा नारा

जैन हिल्स येथे नदी संवर्धन अभियानाच्या कार्यशाळेचा समारोप

जळगाव, दि. १३ (प्रतिनिधी) – नद्या केवळ पाण्याचे स्रोत नाहीत, तर त्या संस्कृतीचा श्वास आणि जीवनाचा आधार आहेत. या नद्यांचे अस्तित्व जपण्यासाठी शासन, समाज, संत आणि उद्योग क्षेत्राने एकत्र येत नदी संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करावी असे आवाहन करत ‘ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ हा नवा नारा जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी जैन हिल्स येथे दिला. नद्या वाचवायच्या असतील, तर केवळ पाणी नव्हे, तर निसर्गाशी असलेले आपले नातेही जपावे लागेल, या भावनेतून निसर्गरक्षणासोबत मानवी गरजांची पूर्तता करणाऱ्या कायद्याचा आग्रह धरावा अशा महत्त्वपूर्ण विचारमंथनाने महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.

कार्यशाळेत विविध विषयांवर सत्रांत चर्चा झाली. सकाळच्या चर्चासत्रात नद्यांच्या स्वच्छता व पावित्र्यात संतांचा सहभाग या विषयावर सविस्तर चर्चा झाली. ‘ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ आणि ‘नीर, नारी, नदी नारायणी’ या घोषणांनी कार्यशाळेचा समारोप झाला. नद्यांचे पुनरुज्जीवन ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर पुढील पिढ्यांप्रती असलेली जबाबदारी आहे, हा संदेश या कार्यशाळेने दिला. शिवाजी भोईटे यांनी कान्हदेशात कांताई बंधाऱ्याच्या रुपाने पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशीप हा जलसंधारणाचा प्रोजेक्ट जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या पुढाकाराने पूर्ण झाला व त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होऊन कोरडवाहू शेती ओलिताची झाली. शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला या बाबत उपस्थितांना सांगितले. डॉ. अनिता पाटील यांनी आसनखेडा येथे नदीवर झालेल्या कामाबद्दल सांगितले. प्रशांत गायकवाड यांनी तितूर नदीचे वैशिष्ट्ये व नदीसाठी झालेल्या कार्याबद्दल पीपीटी सादरीकरण केले.

पाच पाटील मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा याबद्दल प्रभावीपणे सांगितले. विशाल सोमकुल (सागर मित्र) यांनी नद्यांसमवेतच सागराचे व सागराखाली असलेल्या वनस्पतींचे महत्त्व विषद केले. या सोबतच युयुत्सू, आदिनाथ ढाकणे आणि सुनील रहाणे यांनी सादरीकरण केले. तानाजी भोसले यांनी नद्यांशी ५००० शिक्षक आणि ६० हजार विद्यार्थी कसे जोडले याबद्दल सांगून. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील असना नदी या बाबत सविस्तर विचार मांडले.

मेजर जनरल संजय विश्वासराव यांनी देखील प्रभावी विचार मांडले. यासोबतच ‘नीर’, ‘नारी’ आणि ‘नदी’ यांचे महत्त्व देखील वक्त्यांनी अधोरेखित केले. गोपाळ पाटील, परीक्षित चिमणकर, जयाजी पाइकराव, नरेंद्र चुघ, भिला पाटील या वक्त्यांनी आपले विचार मांडले.

जल पुरुष राजेंद्र सिंह यांनी नद्या आणि पर्वत या महत्त्वाच्या विषयावर सर्वांचे लक्ष केंद्रीत केले. पर्वत संरक्षण कायद्याच्या प्रारूपासह नदी संवर्धनासाठी आवश्यक कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्याबाबत सविस्तर विचार मंथन केले. निसर्गाचे रक्षण आणि मानवी गरजांची पूर्तता यांचा समतोल साधणारा कायदा सरकारने लवकर मंजूर करावा याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल व लवकरच शासनदरबारी हे ठराव संमत होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित सहभागी प्रतिनिधींना राजेंद्र सिंह यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश नारायणकर यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
Next Article दोन पोलीस कुटुंबांवर दुःखाचा डोंगर ; पोलिस अधीक्षक धिवरेंनी दिला भावनिक आधार
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.