Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन
जळगाव जिल्हा

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

By मुकेश जोशी, संपादकOctober 17, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन
_माझं स्वप्न ‘नशामुक्त जळगाव’ अभियान उत्साहात

जळगाव, दि १७, (प्रतिनिधी) : ‘व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज असून, जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने वैशाली फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझं स्वप्न नशामुक्त जळगाव’ अभियानाला जैन उद्योग समूहाचे सहकार्य राहील’, असे आश्वासन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिले.

या अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्प आणि जनजागृतीच्या विविध संकल्पनांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने वैशाली फाउंडेशनतर्फे आयोजित नशामुक्त जळगाव अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली पाटील यांनी प्रास्ताविकेत या उपक्रमाबाबत माहिती सांगितली. राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, महापौर दीपमाला काळे, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी राहुल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सादरीकरणाद्वारे नशेचे दुष्परिणाम आणि त्याविषयीची जनजागृती याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध शाळांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचोपडा येथील विवेकानंद विद्यालयात इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांनी घेतली ‘आधुनिक दुर्गां’ची मुलाखत
Next Article आकाशवाणी जळगावचा ५१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.