Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव»आकाशवाणी जळगावचा ५१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
जळगाव

आकाशवाणी जळगावचा ५१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

By मुकेश जोशी, संपादकOctober 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आकाशवाणी जळगावचा ५१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
खानदेशच्या सांस्कृतिक, कृषी आणि सामाजिक विकासात आकाशवाणीचे मोलाचे योगदान

जळगाव/प्रतिनिधी :- खानदेशच्या सांस्कृतिक, कृषी आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आकाशवाणी जळगावचा ५१ वा वर्धापन दिन शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी साजरा करण्यात आला.आकाशवाणी जळगावची स्थापना १६ ऑक्टोबर १९७६ रोजी झाली. गेल्या पाच दशकांपासून आकाशवाणीने खानदेशातील श्रोत्यांशी आपले अतूट नाते जपले आहे.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य जपत आकाशवाणी जळगावने माहिती,शिक्षण आणि मनोरंजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. खानदेशातील सांस्कृतिक परंपरा, लोककला, लोकसंगीत, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आकाशवाणीचे योगदान उल्लेखनीय आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक मार्गदर्शन, महिला वर्गासाठी उपयुक्त कार्यक्रम, युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांना आपले विचार आणि कला सादर करण्याची संधी आकाशवाणीने उपलब्ध करून दिली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात माहिती पोहोचविणे, जनजागृती करणे आणि समाजाला मार्गदर्शन करणे यामध्येही आकाशवाणीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आकाशवाणी जळगावच्या माध्यमातून अनेक कलाकार, साहित्यिक, लोककलावंत, शेतकरी आणि नवोदित प्रतिभावंतांना आपली कला व विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे.बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही आकाशवाणीने आपली विश्वासार्हता आणि लोकाभिमुख कार्याची परंपरा कायम ठेवली आहे.वर्धापन दिनानिमित्त अभियांत्रिकी प्रमुख भारती नेमाडे,निवृत्त केंद्रप्रमुख सुधीर ओखदे,निवृत्त अकाउंटंट एन.एस कुलकर्णी ( नाना) ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,जळगांव, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर बोबडे,कार्यक्रम प्रमुख विजय भुयार आणि आकाशवाणी जळगाव केंद्रातील नैमित्तिक उद्घोषक यांच्या उपस्थितीत केक कापण्यात येऊन आनंद व्यक्त करण्यात आला. डॉ.एन.एस. चौधरी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर घेण्यात आले.अनेकांनी शिबिराचा लाभ घेतला.
सध्या आकाशवाणी जळगाव येथे केंद्रप्रमुख तथा कार्यक्रम प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर बोबडे,कार्यक्रम अधिकारी विजय भुयार आणि वरिष्ठ उद्घोषक नरेंद्र ठाकूर कार्यरत आहेत.
आकाशवाणी जळगावच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व रसिक श्रोते, कलाकार, शेतकरी, हितचिंतक आणि नागरिकांनी शुभेच्छा दिल्यात.खानदेशच्या जनजीवनाशी जोडलेले हे माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाचे माध्यम भविष्यातही अधिक प्रभावीपणे कार्यरत राहो, हीच अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन
Next Article ज.सू खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.