Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्रीडा»फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार
क्रीडा

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

By मुकेश जोशी, संपादकOctober 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार
जळगाव : जळगाव जिल्ह्यात फुटबॉलच्या विकासासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुख शेख यांना सन २०२५-२६ चा ‘विफा स्पेशल रिकगनेशन अवार्ड* (विशेष मान्यता पुरस्कार’) प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील फुटबॉलच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थात विफा यांच्या वतीने दरवर्षी फुटबॉल क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. यंदाचा विशेष मान्यता पुरस्कार जळगाव फुटबॉल असो चे सचिव  फारुख शेख यांना वैयक्तिक स्वरूपात प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्काराच्या प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आले आहे की, राज्य आणि जिल्ह्यात फुटबॉलच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. फारुख शेख यांना सन २०२५-२६ चा विशेष मान्यता पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
१६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील कुपरेज फुटबॉल मैदानावर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात विफा अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते फारुख शेख यांना शाल,तर वरिष्ठ उपाध्यक्ष हरीश होरा चे हस्ते प्रमाण पत्र, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम चे हस्ते स्मृती चिन्ह व माजी आमदार मालोजीराव छत्रपती यांच्या हस्ते चषक  प्रदान करण्यात आले. त्यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार सुनील धांडे,सचिव प्रो.डॉ. किरण चौगुले व खजिनदार सलीम परकोटे यांची उपस्थिती होती.
फारुख शेख यांनी जळगाव जिल्ह्यात फुटबॉल संघटनेचे कार्य अधिक व्यापक करताना खेळाडूंच्या विकासाला प्रोत्साहन, मुला-मुलींच्या स्पर्धांचे आयोजन, शालेय फुटबॉलला चालना, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन तसेच नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे.
त्यांच्या या कार्याची राज्यातील फुटबॉलची सर्वोच्च अधिकृत संघटना असलेल्या विफा कडून वैयक्तिक पुरस्काराद्वारे घेतलेली दखल ही जळगावच्या फुटबॉल क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक, पंच, शालेय क्रीडा क्षेत्रातील शिक्षक व संघटक यांना निश्चितच प्रोत्साहन मिळणार असून, जिल्ह्यातील फुटबॉल विकासाची वाटचाल अधिक वेगाने करण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
फारुख शेख यांच्या या सन्मानाबद्दल फुटबॉल संघटनेचे आश्रयदाते? अशोक भाऊ जैन, अतुल भाऊ जैन ,अध्यक्ष डॉ उल्हास पाटील सह जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक, पंच, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि एकता संघटना व फुटबॉल प्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो कॅप्शन —   फारूक शेख यांचा गौरव करताना प्रफुल भाई पटेल, मालोजी राव छत्रपती, हरीश वोरा, विश्वजीत कदम,सुनील धांडे ,प्रो किरण चौगुले आदी दिसत आहे
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज.सू खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न
Next Article आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

ज.सू खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.