Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव»ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव
जळगाव

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

By मुकेश जोशी, संपादकOctober 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

जळगाव दि.21 प्रतिनिधी* : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. हे औचित्य साधून भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि शासकीय विधि महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन २०२६’ विशेष सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते.

तळागाळात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी तसेच वाचन संस्कार घडवण्यासाठी अविरतपणे मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील दहा वाचनदूतांचा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याहस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट आणि रोख दहा हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. ग्रंथालये समृद्ध करणे, ग्रामीण आणि वंचित घटकांपर्यंत पुस्तके पोहचविणे तसेच नव्या पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे यासाठी या वाचनदूतांनी राबवलेल्या उपक्रमांचे सचिन अहिर यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

‘ती आणि मी’ हे पुस्तक जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी लिहिले असून मॅजेस्टीक प्रकाशनद्वारा प्रकाशित झाले आहे. हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत या पुस्तकाचा भावानुवाद झाला असून एक लाखाच्यावर प्रती वाचकांपर्यंत पोहचल्या आहेत. समर्पित सहजीवनाचं प्रेरणादायी आत्मकथनपर चिंतन अशी या पुस्तकाची ओळख आहे. घराघरात ‘ती आणि मी’ हे पुस्तक पोहचविण्यासाठी ‘वाचनगाडा’ गाडीच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात आले. महाराष्ट्रातल्या दूरवरच्या खेड्यापाड्यातील शाळा-महाविद्यालये तसेच ग्रंथालये आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भाषणं-व्याख्यानं देत ज्ञानेश्वर शेंडे यांनी परिश्रम घेतले. ‘ती आणि मी’ पुस्तकाचे वितरण कार्य सुरू असताना वाचकांचा लेखकाशी झालेला पत्रसंवाद, या पुस्तकावरील भाषण, आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचा वृतांत तसेच परिसंवादातील विचारदर्शन यावर आधारित ‘ती आणि मी : प्रतिसाद’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. प्रस्तुत सन्मानाबद्दल जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ज्ञानेश्वर शेंडे यांचे अभिनंदन केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026

ज.सू खडके प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सव निमित्त गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.