कामगारांच्या हाताला काम, कष्टाला सन्मान आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद… हाच गजाकुश ग्रुपच्या दीपोत्सवाचा खरा प्रकाश
आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते कामगारांचा गौरव; तीन महिन्यांचे किराणा साहित्य व मिठाईचे वाटपजळगाव : वर्षभर आपला घाम गाळून, प्रामाणिकपणे आणि समर्पित सेवाभावाने गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.. या सोहळ्यात कामगारांना तीन महिने पुरेल इतके किराणा साहित्य तसेच मिठाईचे गजाकुश ग्रुप तर्फे वाटप करून त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आमदार सुरेश भोळे म्हणाले की, राज्यात कोरड्या दुष्काळाचे सावट असताना आपण दीपोत्सव साजरा करत आहोत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला पाहिजे. आपण ज्या उत्साहाने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो, त्याच आनंदाने आपल्या कामगारांचीही दिवाळी साजरी व्हावी, या भावनेतून गजाकुश ग्रुपतर्फे तीन महिने पुरेल इतके किराणा साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी आमदार सुरेश भोळे,
नगरसेवक अंकीता पाटील, पिंटू काळे,सेवानिवृत्त एपीआय भास्कर पाटील, नगरसेवक विशाल भोळे, पंकज पाटील, शांताराम जाधव, अर्जुन बुंदे,अनिल भोई, ग.भा. शकुबाई गजाकुश,दीपक गजाकुश, प्रकाश गजाकुश,मनोहर गजाकुश, सुनील गजाकुश आदी मान्यवर उपस्थितीत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वर्षभर मेहनत करणाऱ्या कामगारांशी केवळ व्यावसायिक नव्हे, तर भावनिक नाते जोडणे महत्त्वाचे आहे. आपण घरात दिवा लावल्यानंतर आपल्या आयुष्यात जसा प्रकाश निर्माण होतो, त्याचप्रमाणे कामगारांच्या जीवनात आणि त्यांच्या मनातही आनंदाचा प्रकाश निर्माण झाला पाहिजे. कामगारांच्या कुटुंबातही दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा, हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
कामगार हा कोणत्याही उद्योगाचा खरा आधारस्तंभ असतो. त्यांच्या कष्टामुळेच उद्योगाची प्रगती होत असते. त्यामुळे कामगारांच्या मेहनतीची दखल घेऊन त्यांना सन्मान, आपुलकी आणि आनंद देण्यात आले.असल्याचे प्रकाश गजाकुश यांनी सांगितले.
