Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»कृषी»खरीप २०२६-२७ साठी ई-पीक पाहणी व फार्मर आयडी (Farmer ID) तात्काळ पूर्ण करा
कृषी

खरीप २०२६-२७ साठी ई-पीक पाहणी व फार्मर आयडी (Farmer ID) तात्काळ पूर्ण करा

By मुकेश जोशी, संपादकSeptember 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

खरीप २०२६-२७ साठी ई-पीक पाहणी व फार्मर आयडी (Farmer ID) तात्काळ पूर्ण करा
​जळगाव तहसीलदारांचे तालुक्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
​जळगाव (विशेष प्रतिनिधी):—–  जळगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०२६-२७ साठी ई-पीक पाहणीची नोंद तसेच ॲग्री स्टॅक (Agri Stack) अंतर्गत आपली नोंदणी करून फार्मर आयडी (Farmer ID) तात्काळ व अचूक पद्धतीने तयार करून घ्यावा, असे आवाहन जळगावच्या तहसीलदारांनी केले आहे. तालुक्यातील एकही शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून व पीक पाहणीच्या नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी हे काम वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
​अशी करा नोंदणी प्रक्रिया:
​ॲप डाऊनलोड करा:
सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअरवरून DCS (MH) किंवा ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून शेतकरी म्हणून नोंदणी करावी.
​फार्मर आयडी (Farmer ID) व ओटीपी:
ॲपमध्ये भाषा निवडून शेतकरी म्हणून लॉगिन करा. आपला फार्मर आयडी (Farmer ID) प्रविष्ट करा. प्राप्त झालेला ओटीपी (OTP) टाकून व्हेरिफाय करा आणि ४ अंकी पिन सेट करा.
​माहिती भरा व खाते निवडा:
खाते क्रमांक, भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक, क्षेत्र आणि खरीप २०२६-२७ हंगाम निवडा.
​पिकाची नोंद व छायाचित्र (फोटो):
प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाचे नाव, वान, पेरणीची तारीख, सिंचनाचा प्रकार इत्यादी अचूक माहिती भरा. त्यानंतर पिकाचे तीन स्पष्ट फोटो ॲपद्वारे काढून अपलोड करा व माहिती जतन (Save) करा.
​आवश्यक सुविधा:
फोटो अपलोड करताना व नोंद सादर करताना मोबाईलमधील जीपीएस (GPS/Location) व इंटरनेट सुविधा सुरू ठेवणे आवश्यक आहे.
​त्रुटी दुरुस्तीची सोय:
​नोंद सादर करण्यापूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी. नोंदणीमध्ये काही चूक झाल्यास अथवा दुरुस्ती करायची असल्यास ४८ तासांच्या आत दुरुस्ती करणे किंवा नोंद रद्द करण्याची सुविधा ॲपमध्ये उपलब्ध आहे.
​”ई-पीक पाहणी आणि ॲग्री स्टॅक अंतर्गत मिळणारा ‘फार्मर आयडी’ ही शेतकऱ्यांच्या पिकाची अधिकृत नोंद म्हणून अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे विविध शासकीय योजना, पीक विमा आणि अनुदानाचा लाभ मिळणे सोपे होईल. त्यामुळे जळगाव तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःहून पुढाकार घेऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.”
​— तहसीलदार, जळगाव

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड
Next Article गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली 
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.