Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्राईम»रावेर तालुका हादरला! केर्‍हाळ्यात जुन्या वादातून तरुणाचा खून
क्राईम

रावेर तालुका हादरला! केर्‍हाळ्यात जुन्या वादातून तरुणाचा खून

By मुकेश जोशी, संपादकOctober 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रावेर तालुका हादरला! केर्‍हाळ्यात जुन्या वादातून तरुणाचा खून

दारूच्या नशेत दोघांत जोरदार हाणामारी; ग्राईंडर मशीनने मानेवर वार, २५ वर्षीय राजू कापडेचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

रावेर तालुक्यातील केर्‍हाळा येथे दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थरारक खुनाच्या घटनेत झाले. मंगळवारी दुपारी साडेएकच्या सुमारास झालेल्या हाणामारीत ग्राईंडर मशीनने मानेवर वार करण्यात आल्याने राजू रवींद्र कापडे (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामसिंग चिंधू भील (वय ७२) याच्यावर संशय असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दारूच्या नशेत पुन्हा वाद; हाणामारीत जीव गेला

मिळालेल्या माहितीनुसार, केर्‍हाळा येथील इंदिरानगर परिसरात रामसिंग भील हे राहत असून ते मिस्तरी काम करतात. राजू कापडे व रामसिंग भील यांची एकमेकांशी ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असताना पुन्हा वाद झाला आणि त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. यावेळी रामसिंग भील यांनी लोखंडी आसारी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्राईंडर मशीनने राजू कापडे यांच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्याने राजू कापडे जागीच कोसळले.

ग्रामस्थांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

घटनेनंतर ग्रामस्थांनी संशयित रामसिंग भील याला ताब्यात घेत एका घरात कोंडून ठेवले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रावेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी राजू कापडे यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

रावेर पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली. सहाय्यक निरीक्षक अमूल बच्छाव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.

भरदिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेने केर्‍हाळा परिसरासह संपूर्ण रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची CBI चौकशी करा
Next Article भंगार बाजारातील 117 गाळेधारकांना सन्मानाने जागा उपलब्ध करून नुकसान भरपाई द्या
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ देऊन गौरव

October 21, 2026

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न झाले

October 20, 2026

आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी

October 19, 2026

फुटबॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल फारुख शेख यांना २५-२६  ‘वीफा चा विशेष मान्यता पुरस्कार

October 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.