Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»Blog»खासगी फायनान्स अन् सावकारीच्या जाचातून शिपायाने संपवले जीवन?
Blog

खासगी फायनान्स अन् सावकारीच्या जाचातून शिपायाने संपवले जीवन?

By मुकेश जोशी, संपादकOctober 28, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव : जळगाव शहरातील चौबे हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या माधवराव देशमुख (उर्फ नंदू) यांनी जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांनी काही खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले होते. तसेच काही खासगी सावकारांकडूनही व्याजाने पैसे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कर्जवसुलीसाठी घरी येणारे काही जण त्यांना अपमानित करत, धमकावत आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. देशमुख यांच्या खिशात नोट आढळल्याचे समजते. या चिठ्ठीत काही फायनान्स कंपन्या आणि कथित त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे नमूद असल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीतील मजकूर आणि त्यातील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी होणे आवश्यक आहे.

संबंधित फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संशयित सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, सुसाईड नोटमधील मजकूर, कर्जवसुलीचे स्वरूप आणि छळाच्या आरोपांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकुंभमेळ्यात साधू आणि आखाड्यांना भोजन देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून वाद
Next Article विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांचे निकाल जाहीर
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’! ३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’; सात ज्योतींतून समृद्धीचा संदेश

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.