Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»राजकारण»कुंभमेळ्यात साधू आणि आखाड्यांना भोजन देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून वाद
राजकारण

कुंभमेळ्यात साधू आणि आखाड्यांना भोजन देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून वाद

By मुकेश जोशी, संपादकOctober 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू आणि आखाड्यांना भोजन देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र, अन्नदान करणाऱ्या आखाड्यांनाच भोजन देण्याच्या घोषणेवर महंत भक्ती चरणदास यांनी प्रश्न उपस्थित केले.

नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधू आणि आखाड्यांना भोजन देण्याची केलेली घोषणा चर्चेत आली आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांच्या भोजनाची जबाबदारी शिवसेना (शिंदे गट) उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, कुंभमेळ्यात साधू आणि आखाडेच भाविकांना अन्नदान करतात, अशा पार्श्वभूमीवर या घोषणेवर काही साधू-महंतांनी प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. त्यामुळे शिंदे यांच्या घोषणेमागे नेमका विचार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण येत्या 31 ऑक्टोबरला होत आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हा उपक्रम होईल. त्यासाठी कार्यक्रमांची लगबग सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे आनंदकुंभ संत संमेलनाला हजेरी लावली. आखाड्यांच्या प्रतिनिधींच्या या संमेलनात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू आणि आखाडे यांना भोजन देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात ही जबाबदारी शिवसेना शिंदे पक्ष उचलणार आहे. त्याबाबत कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

उत्साहात केलेल्या या घोषणेची साधू आणि महतांमध्ये चांगलेच चर्चा आहे. अनेक साधुंनी या घोषणेबाबत खंत व्यक्त केली. कुंभमेळ्या विषयी अज्ञान आणि राजकीय उत्साहातून ही घोषणा झाली असावी अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

मुळात कुंभमेळ्यासाठी येणारे साधू हेच भाविकांना भोजन आणि दान करण्यासाठी येतात. साधू ग्राम मध्ये विविध संस्था आणि आखाडे तसेच खालचा तिन्ही पर्वण्या होईपर्यंत भंडारा चालवतात. त्यात भाविकांना रोज आवर्जून आणि आग्रहाणे भोजन दिले जाते.

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधुंना भोजनासह दक्षिणाही दिली जाते. ही कुंभमेळ्यातील नियमित प्रथा आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी उत्साहात अन्नदान देणाऱ्या साधू आणि आखाड्यांनाच भोजन देण्याची घोषणा केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

यासंदर्भात सिंहस्थ कुंभमेळा आखाडा परिषदेचे प्रतिनिधी महंत भक्ती चरणदास यांनी अशी घोषणा करण्याआधी आखाडे आणि खालसा यामध्ये किती साधू आणि नागा आहेत याची माहिती तरी घ्यायला हवी होती. त्यानंतर घोषणा करायला हवी होती. शासनातर्फे सार्वजनिक पुरवठा विभागाकडून धान्य देण्याची मागणी होत असते. आखाड्यांना भोजन देण्याची घोषणा आजवर कधीही झाली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत सापडल्या अनेक चिठ्ठ्या चिठ्यांमधून भडक संदेश तर मनातील भावना, रोष, संताप व्यक्त
Next Article खासगी फायनान्स अन् सावकारीच्या जाचातून शिपायाने संपवले जीवन?
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

किनगाव प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा : किरीट सोमय्या

October 27, 2026

शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन

October 11, 2026

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवुन त्यांना मदत करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

October 5, 2026

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आजपासून जळगाव जिल्ह्यात

October 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.