Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव जिल्हा»किनगाव प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा : किरीट सोमय्या
जळगाव जिल्हा

किनगाव प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा : किरीट सोमय्या

By मुकेश जोशी, संपादकOctober 27, 2026Updated:October 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
किनगाव प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा : किरीट सोमय्या
पोलिसांच्या कारवाईचे कौतुक; आरएसएस पथसंचलनावरील हल्ल्याची घेतली दखल
जळगाव —-  किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कौतुक केले. या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. किनगाव येथील घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज असून, पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे ते म्हणाले. हल्ल्याच्या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींवरही कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
किनगावमध्ये ज्या गल्लीमध्ये वाद झाला, त्या परिसरात काही व्यक्तींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. स्वातंत्र्यानंतरही संबंधित मार्गावरून अंत्ययात्रा काढताना अडचणी येत असल्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूकही तेथून जाऊ शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. अशी परिस्थिती दुर्दैवी असून, नागरिकांना सुरक्षित वातावरणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम करता आले पाहिजेत, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील लोकसंख्येतील बदलांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. मुस्लिम लोकसंख्या २३ टक्क्यांनी वाढत असून हिंदू लोकसंख्या सहा टक्क्यांनी वाढत असल्याची आकडेवारी त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. लोकसंख्यावाढीतील या फरकावर चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देशात स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता राहिल्याने समाजात गुलामगिरीची मानसिकता निर्माण झाली होती. मात्र, समाज हळूहळू त्या मानसिकतेतून बाहेर पडत असल्याचे सोमय्या म्हणाले. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यानंतर बदलाला सुरुवात झाली आणि २०१९ नंतर त्याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू लागले, असे त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० संदर्भातील निर्णय आणि अयोध्येतील राममंदिर उभारणीचा उल्लेख करत गेल्या काही वर्षांत महत्त्वाचे निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातही बदल दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबईतील मशिदींवरील भोंग्यांच्या प्रश्नावर झालेल्या कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला.
या पत्रकार परिषदेला महापौर दीपमाळा काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी आणि केतकी पाटील उपस्थित होते .
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुक इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली ; राजकीय वातावरण तापले
Next Article मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत सापडल्या अनेक चिठ्ठ्या चिठ्यांमधून भडक संदेश तर मनातील भावना, रोष, संताप व्यक्त
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

धुळ्यात १० हजारांची लाच घेताना स्टेनो जाळ्यात

November 7, 2026

आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

November 6, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.