Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्राईम»भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन
क्राईम

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

By मुकेश जोशी, संपादकNovember 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असतानाच भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्सद्वारे जळगावात आणण्यात आलेला २४० किलो संशयित बनावट खवा प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून जप्त केला. या खव्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ६५ हजार रुपये असून, या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी खव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच संधीचा फायदा घेऊन गुजरातमधील अहमदाबाद येथून संशयास्पद खव्याचा साठा जळगावच्या बाजारपेठेत आणला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, शहरातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाबाहेर हा साठा आल्याची माहिती मिळताच प्रशासनाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली.

नमुने तपासणीसाठी पाठविणार

अधिकाऱ्यांनी खव्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर खवा भेसळयुक्त किंवा बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, सणासुदीच्या काळात खवा, मिठाई आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी खरेदी करताना विशेष खबरदारी घ्यावी. खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

अहमदाबादहून आणलेला हा खवा जळगावमधील नेमक्या कोणत्या व्यापाऱ्याने किंवा मिठाई विक्रेत्याने मागवला होता, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
Next Article आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

धुळ्यात १० हजारांची लाच घेताना स्टेनो जाळ्यात

November 7, 2026

आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

November 6, 2026

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.