Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»कृषी»गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश
कृषी

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

By मुकेश जोशी, संपादकNovember 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा लावाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा आवश्यक साठा सुरक्षित ठेवून गिरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी तीन विरगसिंचन आवर्तने, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी एक सिंचन आवर्तन सोडण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

गिरणा कालव्याच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी पाणी वितरण व्यवस्था सक्षम करणे आवश्यक असल्याचे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालव्यावरील सर्व पाटचाऱ्या व वितरिकांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. पाण्याची गळती व नासाडी रोखून शेवटाच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेली कामे दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत. जिल्हाधिकारी व संबंधित अभियंत्यांनी कामांची नियमित पाहणी करून गुणवत्तेवर नियंत्रण ठेवावे. कामात विनाकारण विलंब किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीस ना. संजय सावकारे, आ. नंदकिशोर महाजन, आ. अमोल पाटील, आ. किशोर पाटील, आ. राम भदाणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा संभ्रम दूर

गेल्या अनेक दिवसांपासून गिरणा परिसरातील शेतकरी शासनाच्या निर्णयाची वाट पाहत होते. गिरणा धरणातून आवर्तन सुटणार की नाही, याबाबत शंकांका असल्यामुळे हंगामाच्या पूर्व तयारीची मेहनत वाया जाईल की, काय? अशी स्थिती निर्माण झालेली असताना याबाबत त्वरीत निर्णय घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती, त्यानुसार जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत कृषीसाठी एक आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झालेला असून, एका आवर्तनावर देखील काही पिकांचा हंगाम येण्याची शक्यता आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleधुळ्यात १० हजारांची लाच घेताना स्टेनो जाळ्यात
Next Article आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’! ३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’; सात ज्योतींतून समृद्धीचा संदेश
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

धुळ्यात १० हजारांची लाच घेताना स्टेनो जाळ्यात

November 7, 2026

आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

November 6, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.