Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»महाराष्ट्र»विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांचे निकाल जाहीर
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांचे निकाल जाहीर

By मुकेश जोशी, संपादकOctober 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र विधानपरिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे किरण रामराव सरनाईक विजयी झाले.

भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी या पाच मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. 27 ऑक्टोबरपासून सुरू झालेली मतमोजणी 29 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने सर्व पाच मतदारसंघांचे निकाल घोषित करण्यात आले.

मतदारसंघनिहाय निकाल

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख जाधव यांना 1,13,840 मते मिळाली. भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना 1,03,912 मते मिळाली.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी यांना 67,231 मते मिळाली. भाजपचे सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना 63,960 मते मिळाली.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना 85,876 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सतीश भानुदासराव चव्हाण यांना 67,752 मते मिळाली.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना 23,117 मते मिळाली. अपक्ष सचिन नवनाथ सानप यांना 13,347 मते मिळाली.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण रामराव सरनाईक यांना 16,663 मते मिळाली. तर काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे यांना 8,636 मते मिळाली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleखासगी फायनान्स अन् सावकारीच्या जाचातून शिपायाने संपवले जीवन?
Next Article आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस माघारी, बिनविरोधच्या शक्यतेने उमेदवार वाढले
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

धुळ्यात १० हजारांची लाच घेताना स्टेनो जाळ्यात

November 7, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात ‘एफडीए’चे चार अधिकारी निलंबित; २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी – मंत्री नरहरी झिरवाळ

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.