Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»महाराष्ट्र»प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात ‘एफडीए’चे चार अधिकारी निलंबित; २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी – मंत्री नरहरी झिरवाळ
महाराष्ट्र

प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात ‘एफडीए’चे चार अधिकारी निलंबित; २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी – मंत्री नरहरी झिरवाळ

By मुकेश जोशी, संपादकOctober 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
 अन्न सुरक्षा कारवाईत कायद्याचे पालन, प्रशासकीय उत्तरदायित्वाला प्राधान्य

मुंबई, दि. ३० : प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात झालेल्या कारवाईची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची भूमिका आणि प्रशासकीय कार्यपद्धतीतील अनियमितता यांची गंभीर दखल घेत या प्रकरणात राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आणखी २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याची कारवाई केली आहे. एकूण २५ अधिकारी प्रशासकीय कारवाईच्या कक्षेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.

ठाणे येथील मेसर्स हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी आणि मावळ तालुक्यातील मेसर्स सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपन्यांवर केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गंभीर अनियमितता केली. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली. चौकशीअंती ‘एफडीए’चे चार अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये अन्न सह आयुक्त दिगंबर भोगावडे, अन्न सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर आणि सी. आर. स्वामी यांचा समावेश आहे. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अन्वये विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कारवाईसाठी दबाव; नकार देणाऱ्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी प्रकरणात संबंधित उत्पादनावर ‘नॉट फॉर इडिबल यूज/ओन्ली फॉर यूज इन हुक्का फॉर स्मोकिंग पर्पज’ असे स्पष्ट नमूद असतानाही अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी सहायक आयुक्त पी. पी. सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आल्याचा उल्लेख अहवालात आहे. सूर्यवंशी यांनी कारवाईस नकार दिल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची बाबही नोंदविण्यात आली आहे.

सोएक्स इंडिया प्रकरणात अधिकारक्षेत्राचा मुद्दा

मावळ तालुक्यातील टाकवे येथील सोएक्स इंडिया प्रा. लि. कंपनीवर २ जानेवारी २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाने कारवाई केली होती. या कारवाईत ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा, ५ लाख ४८ हजार ४८८ किलो वजनाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. कंपनीची आस्थापनाही सील करण्यात आली होती.

२१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी

दोन्ही प्रकरणांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा आढावा घेऊन शासनाने प्रशासकीय शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू केली आहे. चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून, अन्य २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका, कारवाईची कायदेशीर वैधता, अधिकारक्षेत्र आणि प्रशासकीय आदेशांचे पालन यांची तपासणी केली जाणार आहे.

अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कारवाई करताना कायद्याचे पालन आणि प्रशासकीय उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस माघारी, बिनविरोधच्या शक्यतेने उमेदवार वाढले
Next Article मनिषा भानवाला कुस्ती मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

धुळ्यात १० हजारांची लाच घेताना स्टेनो जाळ्यात

November 7, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांचे निकाल जाहीर

October 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.