मनिषा भानवाला कुस्ती मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला
भारतीय कुस्तीच्या इतिहासत शुक्रवारी एक सोनेरी पान जोडले गेले. कझाकस्तानच्या अस्ताना येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मनिषा भानवाला हिने महिलांच्या ५९ किलो गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. जागतिक कुस्ती स्पर्धेत चॅम्पियन ठरणारी ती पहिलीच भारतीय महिला, तर २०१० मध्ये सुशील कुमारनंतर (६६ किलो) हे यश मिळवणारी एकूण केवळ दुसरी भारतीय कुस्तीपटू ठरली. या स्पर्धेत नीलम सिरोही (५० किलो) आणि काजोल धोचक (७६ किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, हरियाणाच्या मनिषाने ऐतिहासिक सुवर्ण जिंकून भारताची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली.
०-६ च्या पिछाडीवरून मिळवला विक्रमी विजय
अंतिम सामन्यात मनिषाने अमेरिकेच्या अबीगैल नेटचा ८-६ असा रोमँटिक पराभव केला. सुरुवातीला अमेरिकन खेळाडूने आक्रमक खेळ करत ६-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात मनिषाने जबरदस्त पुनरागमन करत सलग ७ गुण मिळवले. अखेरच्या २७ सेकंदांत तिने आपली आघाडी टिकवून ठेवत ऐतिहासिक विजय मिळवला.
