Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»क्रीडा»‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प.. ५ हजार शाळांपर्यंत पोहचणार; जैन हिल्सला झालेल्या बैठकीत २० जिल्ह्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग..
क्रीडा

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प.. ५ हजार शाळांपर्यंत पोहचणार; जैन हिल्सला झालेल्या बैठकीत २० जिल्ह्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग..

By मुकेश जोशी, संपादकOctober 31, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त सहकार्याने पुढील पाच ते दहा वर्षात ५ हजार शाळांपर्यंत ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम राबविला जाईल. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या जैन हिल्स येथे झालेल्या बैठकीत याबाबतचे उद्दिष्ट ठरले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले हे व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते ‘चेस इन स्कूल’ या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. या बैठकीत राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

२००८ पासून अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज संघटना देशातील अग्रगण्य संघटनांपैकी एक बनली आहे. राज्यातील ३३ जिल्हे संघटनेशी संलग्न आहेत. गेल्या आठ, दहा वर्षांपासून मागे पडलेला ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम अशोक जैन, अतुल जैन यांच्या पुढाकाराने आज पुन्हा सुरू करण्यात आला. या उपक्रमाच्या पुनरुज्जीवनासाठी जैन इरिगेशन, जैन स्पोर्टस् अकॅडमीने पुढाकार घेतल्याबद्दल अशोक जैन व अतुल जैन यांचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे आभार व्यक्त करून अशोक जैन यांचा अभिजीत कुंटे यांनी तर अतुल जैन यांचा चेस इन स्कूल उपक्रमाचे सचिव विलास म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘चेस इन स्कूल’ लोगोचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या उपक्रमाची पहिली शाळा ही अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन ठरली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बुद्धिबळाचे साहित्य देण्यात आलीत ती प्राचार्य मनोज परमार सह शाळेतील सहकाऱ्यांनी स्वीकारली.

खेळाडू घडविणे हेच ध्येय – अशोक जैन
उपस्थितांशी अशोक जैन यांनी संवाद साधला, बुद्धिबळाशी माझा अभिजीत कुंटे यांच्यामुळे संबंध आला. सुरुवातीपासूनच पक्ष, धर्म, समाज आणि व्यावसायिक भेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन बुद्धिबळाचा विकास करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. खेळात राजकारण नको, तर खेळाडू घडविणे हेच आपले ध्येय असावे. ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम महाराष्ट्रातील बुद्धिबळ विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आर्थिक, मनुष्यबळ व संघटनात्मक सहकार्य देऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची आमची तयारी आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राने तमिळनाडूपेक्षा अधिक प्रगती करावी, हे आपले ध्येय असावे. हीच आपली भूमिका असली पाहिजे असेही ते म्हणाले.

‘चेस इन स्कूल’ उपक्रम मिशन मोडवर राबविणे – अतुल जैन
‘चेस इन स्कूल’ उपक्रम पुन्हा सुरू होत असल्याबद्दल अतुल जैन म्हणाले की, महाराष्ट्र बुद्धिबळ क्षेत्र प्रगतीवर आहे. अशोक जैन यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रॅण्डमास्टरची संख्या दोनवरून १४ पर्यंत पोहोचली, तर महिला खेळाडूंच्या कामगिरीतही उल्लेखनीय वाढ झाली. ‘चेस इन स्कूल’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सुरुवातीला दहा शाळा सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल. शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम मिशन मोडवर राबविणे आवश्यक असल्यांचे अतुल जैन म्हणाले.

नव्या पिढीसाठी बुद्धिबळ अत्यंत प्रभावी…
आजच्या वेगाने बदलणाऱ्या एआयच्या युगात नव्या पिढीची विचारक्षमता, एकाग्रता, निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी बुद्धिबळ हे अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते. खेळातून टीमवर्क, कौशल्य, पराभव स्वीकारण्याची ताकद आणि विजयात नम्र राहण्याचे संस्कार रुजतात. विशेषतः तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण करून त्याचा पाया शाळास्तरावर भक्कम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांना कोटी कोटी नमन!
Next Article ‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ कौशल्याने प्रभावित
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

November 6, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.