Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»Blog»‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ कौशल्याने प्रभावित
Blog

‘चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ कौशल्याने प्रभावित

By मुकेश जोशी, संपादकOctober 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव दि.३१ प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, तार्किक विचारशक्ती, विश्लेषण क्षमता, रणनीती आखण्याचे कौशल्य, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘चेस इन स्कूल्स’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम राबविणारी जळगावातील पहिली शाळा होण्याचा मान अनुभूती विद्या निकेतनने मिळविला आहे. या उपक्रमासाठी ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे उपस्थित होते. त्यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळातील कौशल्य पाहून विशेष आनंद व्यक्त केला. लहान वयातच विद्यार्थ्यांनी दाखविलेली समज, एकाग्रता आणि खेळातील चालींचे आकलन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला. बुद्धिबळामुळे मुलांमध्ये संयम, आत्मविश्वास, शिस्त आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होत असल्याचे ते म्हणाले.

शाळेचे प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले की, अनुभूती विद्या निकेतनमध्ये खेळांना शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले जाते. विद्यार्थ्यांना विविध खेळांचे नियम, तंत्र, रणनीती आणि नियमित सराव यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले जाते. इनडोअर आणि आउटडोअर खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास घडविण्यावर शाळेचा भर आहे. खेळांमुळे आत्मविश्वास, जिद्द, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष चिदंबर किटी भास्कर व राजेंद्र कोंडे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, ‘चेस इन स्कूल्स’चे सचिव विलास म्हात्रे, रवींद्र धर्माधिकारी, बुद्धिबळ प्रशिक्षक प्रवीण ठाकरे आणि क्रीडा प्रशिक्षक स्मिता काटकर उपस्थित होते. अवनी जैन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प.. ५ हजार शाळांपर्यंत पोहचणार; जैन हिल्सला झालेल्या बैठकीत २० जिल्ह्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग..
Next Article जळगाव जिल्हा परिषदेत उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात!
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’! ३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’; सात ज्योतींतून समृद्धीचा संदेश

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.