Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»कृषी»जैन इरिगेशनचा ‘सुपरक्रिटिकल’ कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार १९ हजार टन बायोचार कार्बन क्रेडिट्सचा करणार पुरवठा
कृषी

जैन इरिगेशनचा ‘सुपरक्रिटिकल’ कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार १९ हजार टन बायोचार कार्बन क्रेडिट्सचा करणार पुरवठा

By मुकेश जोशी, संपादकOctober 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव – ‘जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड’ने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कार्बन रिमूव्हल मार्केटप्लेस ‘सुपरक्रिटिकल’ सोबत एक धोरणात्मक करार केला आहे. या करारांतर्गत जैन इरिगेशन २०२६-२७ या कालावधीत तब्बल १९ हजार टनांपर्यंतच्या ‘बायोचार कार्बन रिमूव्हल क्रेडिट्स’चा पुरवठा करणार आहे.

औद्योगिक कचऱ्यातून महसूल निर्मिती

कार्बन क्रेडिट्स जैन इरिगेशनच्या जळगाव (महाराष्ट्र) येथील अत्याधुनिक औद्योगिक बायोचार प्रकल्पातून तयार केले जातील. या प्रकल्पात शेतीचा कचरा आणि अन्न प्रक्रिया उद्योगातून निघणाऱ्या अवशेषांवर ‘गॅसिफिकेशन’ प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते. यातून ‘बायोचार’ (एक प्रकारचा कोळसा) तयार होतो, जो जमिनीत गाडल्यास हवातील घातक कार्बन अनेक शतकांपर्यंत जमिनीत सुरक्षित लॉक करून ठेवतो. यामुळे पर्यावरणामधील कार्बनचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होते.

शाश्वत – पर्यावरणपूरक मॉडल

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सर्व घटकांचा पुनर्वापर केला जातो. प्रक्रियेदरम्यान तयार होणारा ‘सिंगॅस’ जैन इरिगेशनच्या कारखान्यांमध्ये जीवाश्म इंधनाचा पर्याय म्हणून वापरला जातो. तर तयार झालेला बायोचार कंपनीच्या कृषी व्यवसायांमध्ये आणि स्थानिक शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी दिला जातो. यामुळे कंपनीचा नवीन प्रकल्पांसाठी लागणारा भांडवली खर्च तर वाचलाच आहे, शिवाय कचऱ्यातून संपत्ती निर्मितीचे एक आदर्श मॉडेल उभे राहिले आहे.

विश्वासाची भक्कम साखळी

सुपरक्रिटिकल कंपनीचे पुरवठा व्यवस्थापक स्टीव्ह मॉरिन यांनी सांगितले की, “इतर कंपन्यांना बायोचार प्रकल्पांसाठी पुरवठा साखळी शून्यातून उभी करावी लागते. मात्र, जैन इरिगेशनकडे ६० वर्षांहून अधिक काळाचे मजबूत नेटवर्क आणि १ कोटींहून अधिक शेतकऱ्यांचा आधार आहे. जैन इरिगेशन ही जगातील सर्वात मोठी मँगो प्रोसेसिंग (आंबा प्रक्रिया) कंपनी आणि दरवर्षी १५ कोटी रोपांची निर्मिती करणारी टिश्यु कल्चर नर्सरी चालवते. त्यामुळे त्यांना कच्चा माल आणि वितरणासाठी कोणतीही अडचण नाही.

कॉर्पोरेट कंपन्या आता एका वेळेच्या खरेदीऐवजी जैन इरिगेशनसारख्या विश्वासू कंपन्यांसोबत बहु-वार्षिक करार करत आहेत. या प्रकल्पाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी सध्या जागतिक पातळीवरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमनिषा भानवाला कुस्ती मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला
Next Article ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांना कोटी कोटी नमन!
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

October 26, 2026

शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.