Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»शैक्षणिक»अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ 
शैक्षणिक

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ 

By मुकेश जोशी, संपादकOctober 25, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ 

अनुभूती शाळा व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे १४ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम; बालकलाकारांना सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव दि.24 प्रतिनिधी—: बालकांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुभूती बालनिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन बालकलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात ४ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. गायन, वाद्य वादन, नृत्य, नाट्यछटा, नाटिका आणि एकपात्री अभिनय अशा विविध कलाप्रकारांतून बालकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. एकल तसेच सामूहिक स्वरूपात सादरीकरण करता येणार असल्याने मुलांना आपल्या आवडीनुसार सहभाग नोंदविता येईल.

बालकांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, आत्मविश्वास वाढावा आणि कलेच्या माध्यमातून त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बालकलाकारांनी २५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी शुभदा नेवे ८३२९३७५०५७ यांच्या शी संपर्क साधावा.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसीए पराग जैन यांना पीएच.डी . पदवी घोषित
Next Article सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

November 6, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.