Close Menu
Divya Shakti News
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

November 11, 2026

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

November 10, 2026

गजाकुश ग्रुपच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कामगार बंधूंच्या सन्मानार्थ जळगाव येथे ‘दीपावली स्नेहभेट व कामगार सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

November 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Divya Shakti News
Subscribe
  • HOME
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • जळगाव
    • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • नोकरी
  • आणखी
    • कृषी
    • क्रीडा
    • राशी भविष्य
    • विश्लेषण
    • व्हायरल
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
Divya Shakti News
Home»जळगाव»अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार
जळगाव

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार

By मुकेश जोशी, संपादकNovember 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार
वारली चित्रकला, नैसर्गिक साहित्य आणि भूरूपांच्या प्रतिकृती ठरल्या आकर्षण
जळगाव, (प्रतिनिधी) —: विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे भव्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या आकर्षक कलाकृती, नैसर्गिक साहित्याचा कल्पक वापर, पारंपरिक वारली चित्रकला, चंद्राचा विस्तृत नकाशा आणि विविध भूरूपांच्या प्रतिकृतींनी या प्रदर्शनात विशेष लक्ष वेधून घेतले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे चेअरमन अतुल जैन, डॉ. भावना जैन यांच्या हस्ते करण्यात आले. संचालिका निशा जैन आणि अंबिका जैन यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशोक जैन यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती आणि विविध शैक्षणिक नमुन्यांची पाहणी करून कलाकृतींबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांनी शिक्षक आणि पालकांचेही अभिनंदन केले. प्रदर्शनास पालक, शहरातील कलाप्रेमींनी भेट दिली. त्यात सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, फरहाद गिमी, अथांग जैन, अन्मय जैन, महावीर क्लासेसचे नंदलाल गादीया आदिंचा समावेश होता.
‘बेस्ट आउट ऑफ वेस्ट’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून उपयुक्त आणि आकर्षक कलाकृती साकारल्या. नैसर्गिक साहित्याचा वापर करूनही अनेक नावीन्यपूर्ण वस्तू तयार करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पारंपरिक वारली चित्रकलेने संपूर्ण शालेय परिसराला सांस्कृतिक आणि कलात्मक साज चढवला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय लोककला आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देण्यात आली. प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरला तो इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला चंद्राचा विस्तृत नकाशा. या नकाशात चंद्रावरील पर्वत, दऱ्या, विविध भौगोलिक रचना तसेच चांद्रयान आणि अपोलो-११ यांच्या चंद्रावरील उतराईची ठिकाणे दर्शविण्यात आली होती. लहान वयातच विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनातील बारकावे समजून घेत त्यांचेले सादरीकरण केले, लक्षवेधी ठरले. या सोबतच पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्या, बेटे आणि द्वीपकल्प अशा विविध भूरूपांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. या प्रतिकृतींच्या माध्यमातून भूगोलातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. कला, विज्ञान, भूगोल आणि पर्यावरण या विषयांचा सुंदर समन्वय या प्रदर्शनातून साधण्यात आला.
हे प्रदर्शन केवळ कलाकृतींचे सादरीकरण न ठरता विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणविषयक जाणीव आणि भारतीय कला-संस्कृतीविषयीच्या आदराचे प्रतिबिंब ठरले. निरीक्षण, संशोधन, स्वतंत्र विचार आणि कल्पनांना प्रत्यक्ष कलाकृतींचे रूप देण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून मिळणारे शिक्षण अधिक आनंददायी, अर्थपूर्ण आणि जीवनाशी या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी जोडले गेले.
फोटो म्हध्ये -अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना अतुल जैन, डॉ. भावना जैन, मनोज परमार आणि स्कूलच्या शिक्षिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसायबर गुन्हेगारीवर ‘मिशन सतर्क’! शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिले सत्र
Next Article दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
मुकेश जोशी, संपादक
  • Website

मुख्य कार्यालय : नवनाथ चौक, हरी विठ्ठल नगर, जळगाव. कार्यालयीन पत्ता : बी-16, चौथा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. मोबाईल : 📞 9022260724, 📞 9421002607

Related Posts

गिरणेचे आवर्तन सुटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 7, 2026

आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण … कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

November 6, 2026

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

November 6, 2026

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या...
© 2026 . Designed by ANIKET PATIL MOB.8329898914
  • Home
  • Buy Now

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.